MPSC सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करा,ठाकरे सरकारचा मंत्री राज्यपालांना भेटून विनंती करणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलाखत प्रक्रिया पाडण्याची गरज आहे. मुलाखत घेणाऱ्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल राज्य सरकारकडून राज्यपालांकडे पाठवण्यात आलीय.

MPSC सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करा,ठाकरे सरकारचा मंत्री राज्यपालांना भेटून विनंती करणार
दत्तात्रय भरणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 1:49 PM

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलाखत प्रक्रिया पाडण्याची गरज आहे. मुलाखत घेणाऱ्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल राज्य सरकारकडून राज्यपालांकडे पाठवण्यात आलीय. तर, राजभवनाकडून ही फाईल 2 ऑगस्ट म्हणजेच सोमवारी मिळाल्याचं सांगण्यात आलंय. आता ठाकरे सरकारमधील सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. एमपीएसी सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करावी, अशी विनंती राज्यपालांना करणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं आहे.

दत्तात्रय भरणे राज्यपालांची भेट घेणार

MPSC सदस्य नियुक्तीच्या फाईल राज्यपालांनी तात्काळ मंजूर करावी यासाठी राज्य सरकारकडून राज्यपालांना विनंती करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार आहेत. दत्तात्रय भरणे प्रत्यक्ष राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विनंती करणार आहेत.

सरकारमध्ये अस्वस्थता

राज्य सरकारनं एमपीएससी सदस्यांच्या नियुक्तीची फाईल देऊनही राज्यपालांनी MPSC सदस्य नियुक्तीबाबतच्या फाईलवर अद्याप सही न केल्याने राज्य सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. MPSC वर 31 जुलैपूर्वी सदस्य नियुक्त केले जातील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्य सरकारने MPSC सदस्य नियुक्तीची फाईल मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली होती. फाईलवर राज्यपालांची सही होत नसल्याने MPSC सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. राज्यात 2192 पदांसाठी 6998 उमेदवारांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत. त्यासाठी MPSC ला जादा सदस्यांची गरज आहे.

राज्यपालांना फाईल कधी मिळाली?

एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल अगोदरच राजभवन येथे पाठविली आहे अश्या आशयाच्या बातम्या काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात शिफारस असलेली नस्ती सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी दुपारनंतर राजभवन येथे प्राप्त झाली असून ती राज्यपालांच्या विचाराधीन आहे, असं राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

Maratha Reservation : मोदी सरकारचा मुळावर घाव, थेट 102 व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल करणार!

‘वन बूथ, 25 यूथ’, भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु

Dattatray Bharane will meet Governor Bhagatsingh Koshyari for request to sanction file of MPSC members appointment

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.