कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी झापलं, म्हणाले….

सवदींनी केलेल्या विधानाला काही आधार नाही, काही तारतम्य नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी सवदींना फटकारलं. | DCM Ajit pawar reply Laxman Savadi over maharashtra- karnataka Border issue

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी झापलं, म्हणाले....
Ajit pawar And Laxman Savadi
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 12:37 PM

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra- karnataka Border issue) कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार आमनेसामने आलं आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit pawar) यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (DCM Laxman Savadi) यांना चांगलंच झापलं. बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असा दावा करणाऱ्या लक्ष्मण सवदी यांना अजित पवारांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. सवदींनी केलेल्या विधानाला काही आधार नाही, काही तारतम्य नाही, अशा शब्दात त्यांनी सवदींना फटकारलं. (DCM Ajit pawar reply Laxman Savadi over maharashtr- karnataka Border issue)

“जी गावं वादग्रस्त आहेत ती केंद्रशासित करावीत असं आपले मुख्यमंत्री म्हणाले. त्याला उत्तर देताना कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी तेथील लोकांना खूश करण्यासाठी मुंबई केंद्र शासित करा, असं म्हणाले असतील, असं सांगत त्यांच्या विधानाला कवडीचा आधार नाही”, असं अजितदादा म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

“बेळगावचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महाजन समितीचाही अहवाल आहे. तसंच ज्यावेळी दोन राज्यांच्या सीमांचा वाद असतो त्यावेळी केंद्र सरकारने हस्तक्षेप करायचा असतो … एकतर्फी बोलायचं नसतं किंवा तसे निर्णयही घ्यायचे नसतात”, असं म्हणत अजित पवारांनी केंद्रावर निशाणा साधला.

“सीमा भागातील वादग्रस्त भाग आमचा आहे असा दाखवण्याचा कर्नाटकचा प्रयत्न आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तसंच या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध” असल्याचं अजित पवार म्हणाले.

केंद्राच्या बजेटवर अजित पवार काय म्हणाले…?

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. गरीब, मध्यमवर्गीयांना दिलासा देतात का यावर आमचं लक्ष आहे. गरीब आणि सर्वसामान्य वर्गाला दिलासा मिळावा. कोरोनाच्या काळात सर्वसामान्य उध्वस्त झालाय.. त्याच्या हिताचे निर्णय बजेटमधून दिसावेत, असं अजित पवार म्हणाले.

केंद्र सरकार जीएसटीची रक्कम थकवतंय

जीएसटीचा कायदा आणला तेव्हा केंद्राने भूमिका मांडली होती की जीएसटीचा कर कमी पडला तर आम्ही देऊ. पण अजूनही जीएसटीची संपूर्ण रक्कम आलेली नाही फेब्रुवारीपर्यंतची जीएसटीची रक्कम मार्चपर्यंत आली पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

(DCM Ajit pawar reply Laxman Savadi over maharashtr- karnataka Border issue)

हे ही वाचा :

Maharashtra-Karnataka Border Dispute | असे येडे बरळत असतात; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना राऊतांनी झापले

सीमावादावर शेवटचं हत्यार कोणतं? शरद पवार म्हणाले…..

कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित घोषित करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

निलंगेकर म्हणतात, लातुरात लोकशाहीचा खून! ठाकरे, फडणवीस, देशमुखांकडे अप्रत्यक्ष बोट, राजकीय ‘फिक्सिंग’चा गौप्यस्फोट !

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर नि:पक्षपाती भूमिका घ्या; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.