लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ, 25 लाख रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांची कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांनी व्हिजन मांडलं

Devendra Fadnavis on BJP Manifesto : राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पुढच्या पाच वर्षांसाठी महाराष्ट्रासाठीचं व्हिजन मांडलं. वाचा सविस्तर...

लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ, 25 लाख रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांची कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांनी व्हिजन मांडलं
देवेंद्र फडणवीस,
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 11:22 AM

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. यासाठी भाजप पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे. भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा कार्यक्रमात होत आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजन मांडलं. ज्यांच्या प्रेरणेने भारतात आम्ही काम करत आहोत असे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पांना महाराष्ट्रात अस्तित्वात आणण्यासाठी या संकल्पपत्रातून होत आहे. संकल्प पत्र कागदाचा डॉक्युमेंट नाही. पूर्ण ताकदीने काम करण्यासाठीचं पवित्र डॉक्युमेंट आहे. आज १२ वाजता एक स्थगिती पत्र येणार आहे. या राज्यात ज्यांना केवळ चालणाऱ्या प्रकल्पांना स्थगिती देण्यास रस आहे, अशा लोकांचं पत्र १२ वाजता येणार आहे. पण जनतेचा विश्वास महायुतीवर आहे, भाजपवर आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

लाडक्या बहिणींसाठी भाजपचं प्लॅनिंग, योजनेची रक्कम वाढवणार

आजचं संकल्पपत्रात अनेक गोष्टी आहेत. ज्या २५ गोष्टी आम्ही हायलाईट केल्या आहेत. त्यातील १० मुद्दे जो आम्ही महायुतीचा दहाकलमी कार्यक्रम घोषित केला. आम्ही लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. आम्ही भावांतर योजना आणणार आहोत. जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. हे मागच्यावर्षी करून दाखवलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

वृद्धांसाठीच्या पेन्शनमध्ये वाढ

प्रत्येक गरीबांना अन्न व निवाऱ्याचा हक्क देण्याचा निर्णय घेतला आहे. वृद्ध पेन्शन योजना १५०० रुपयांवरून २१०० रुपये करणार आहोत. आम्हीच ते १५०० रुपये केले होते. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करण्यासाठी मार्केट इंटरवेन्शन करणार आहोत. महाराष्ट्रात २५ लाख रोजगारांची निर्मिती करणार आहोत. त्यासोबत १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या माध्यमातून लाभ देऊ. सरकार स्थापनेच्या १०० दिवसात व्हिजन डॉक्यूमेंट तयार करू. मेक इन महाराष्ट्राचं धोरण प्रभावीपणे राबवू, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

रोजगार निर्मितीवर भर

२५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. एफडीआय मध्ये ५२ टक्के महाराष्ट्राकडे आला आहे. त्यातून १० लाख विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी अग्रेसर असू.सरकारी नोकऱ्यांमधील निर्बंध गटात १ लाख पेक्षा जास्त नोकरी सरकारी क्षेत्रात दिल्या आहेत. सौर व अक्षय उर्जेचा वापर करून वीज बिलात ३० टक्क्यांवर सूट देणार आहेत. व्हिजन डॉक्युमेंट तयार करू. विज्ञानामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर ठेवणार आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’साठी प्रयत्न करणार आहोत. फिनटेक आणि एआय मध्ये मोठी गुंतवणूक करणार आहोत, असं म्हणत फडणवीसांनी व्हिजन मांडलं.

Non Stop LIVE Update
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.