मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू, 3 दिवसात 3 पोलिसांच्या मृत्यूने खळबळ
कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलीस कर्मचारी देखील कोरोनाचे बळी ठरत आहेत (Police constable death in Mumbai due to corona).
मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलीस कर्मचारी देखील कोरोनाचे बळी ठरत आहेत (Police constable death in Mumbai due to corona). मुंबईत कोरोना संसर्गामुळे आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. ते कुर्ला ट्रॅफिकमध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते. मागील 3 दिवसात कोरोनामुळे 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे.
दरम्यान याआधी मुंबई पोलिस दलातील 2 हवालदारांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला होता. सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व पोलीस कर्मचारी 50 वर्षे वयापेक्षा जास्त वयाचे होते. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी मृत्यू झालेल्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा केली होती.
कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, हे कळवण्यास मुंबई पोलिसांना अत्यंत दुःख होत आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. आमची सद्भभावना त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम राहील.
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 27, 2020
‘दुर्दैवाने मुंबई पोलिसांच्या दोघा कर्मचाऱ्यांनी कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या युद्धात बलिदान दिले. सरकार दोन्ही कुटुंबियांसोबत आहे. दोन्ही परिवारांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल. आम्ही त्यांना आवश्यक ते सर्व देऊ’ असं अनिल देशमुख म्हणाले होते.
#coronavirus मुळे दोन पोलिसांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुःखद व दुर्दैवी. शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे. दोघांच्याही कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत, योग्य ती शासकीय नोकरी, नियमानुसार इतर मदत- गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांची लाईव्ह प्रसारणाद्वारे माहिती pic.twitter.com/g8ELPlnT9N
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 26, 2020
गेल्या दोन दिवसात मुंबई पोलिस दलातील दोन पोलिसांचा बळी गेला. मुंबई पोलिस दलातील 52 वर्षीय हवालदाराचा आज (26 एप्रिल) कोरोनामुळे मृत्यू झाला. तर काल (25 एप्रिल) 57 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबललाही कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. संबंधित कर्मचारी वाकोला पोलिस ठाण्यात कार्यरत होता, तर वरळीचा रहिवासी होता.
हेही वाचा : ‘कोरोना’ लढ्यातील महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच, अजित पवारांची मोठी घोषणा
महाराष्ट्रात आतापर्यंत 107 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 17 अधिकाऱ्यांचा, तर 90 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गृह मंत्रालयातील अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. आतापर्यंत सात पोलिस कोरोनामुक्त झाले, ही दिलासादायक बाब आहे.
वर्षा बंगल्यावरील महिला पोलिसाला कोरोना
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं मागील आठवड्यात समोर आलं होतं.
संबंधित बातम्या :
मुंबई पोलिसातील कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू, कोरोनाचा वाढता कहर
‘मातोश्री’च्या अंगणातील चहावाल्याची कोरोनावर मात, ठाकरे परिवाराचे आभार
Police constable death in Mumbai due to corona