मुंबई, पुण्यासारख्या इतर मोठ्या शहरात काय होणार? मुख्यमंत्री म्हणतात, 48 तासात नवे निर्बंध

पूर्ण लॉकडाऊनची शक्यता आपण नाकारत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे राज्यात येत्या 2 दिवसात लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

मुंबई, पुण्यासारख्या इतर मोठ्या शहरात काय होणार? मुख्यमंत्री म्हणतात, 48 तासात नवे निर्बंध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 9:23 PM

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती विदारक बनली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढतेय. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला एक इशारा दिला आहे. राज्यात तूर्तास लॉकडाऊन लागणार नाही, असं काही मंत्री सांगत असले तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र पूर्ण लॉकडाऊनची शक्यता आपण नाकारत नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे राज्यात येत्या 2 दिवसात लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. (decision about lockdown in the state will be taken in the next two days)

2 दिवसांत लॉकडाऊन निर्णय होणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर बोट ठेवलं. येत्या दोन दिवसांत मी विविध राजकीय पक्ष, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार आदी लोकांशी चर्चा करणार आहे. लॉकडाऊन नको कर अन्य उपाय काय? याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यांच्याकडून उपाय मिळाला नाही आणि दोन दिवसांत राज्यातील कोरोनाचं नेमकं चित्र काय समोर येतं हे पाहून येत्या 48 तासांत नवे निर्बंध लावण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

..तर आरोग्य यंत्रणा अपुरी पडेल – मुख्यमंत्री

राज्यात आता प्रत्येक दिवसाला 40 हजारापेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. रुग्णसंख्येचा आकडा असाच वाढत राहीला तर येत्या 10 ते 15 दिवसांत सध्या असलेली यंत्रणा अपुरी पडणार आहे. रुग्णालये, बेड्सची संख्या वाढवता येईल. पण डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी कमी पडत आहेत. ते ही हाडा-मांसाची माणसं आहेत. अशावेळी लोकांनीच जबाबदारी ओळखून शिस्त पाळणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

आता रस्त्यावर उतराच!

राज्यात लॉकडाऊन लावला तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा विरोधकांकडून दिला जात आहे. मी म्हणतो आता रस्त्यावर उतराच. आता सगळ्यांनीच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. पण रस्त्यावर उतरायचं ते आंदोलन, मोर्चांसाठी नाही. तर लोकांच्या सेवेसाठी. ज्या घरात सर्वच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या मदतीसाठी, जे आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटसाठी जे जिवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत आहेत, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना केलंय.

संबंधित बातम्या :

Uddhav Thackeray speech highlights : आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय

Maharashtra second Lockdown : महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात निर्बंध लागणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

decision about lockdown in the state will be taken in the next two days

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.