या पेयाला राष्ट्रीय ड्रींक जाहीर करा, आसामचे भाजपा खासदार पबित्रा मार्गेरिटा यांची मागणी
भारतात चहाला मोठा इतिहास आहे, चहा पहिल्यांदा 19 व्या शतकात ब्रिटीशांनी देशात आणला होता. त्या काळी भारतात चहाला इतकी मागणी नव्हती, तर दुध आणि इतर पेये अधिक लोकप्रिय होती.
मुंबई : आसामचे भाजप खासदार पबित्रा मार्गेरिटा यांनी चहाला राष्ट्रीय पेय म्हणून घोषित करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. चहा भारतीय संस्कृतीचा एक भाग बनला आहे. रोजची सकाळ चहाच्या एका प्यालाने फ्रेश होते. या अशा आदरातिथ्याचा अविभाज्य घटक बनलेल्या चहाला राष्ट्रीय ड्रींक म्हणून जाहीर करावे अशी मागणी आसामचे भाजपा खासदार पबित्रा मार्गेरिटा यांनी सरकारकडे केली आहे.
चहा खरे तर परदेशातून येथे इंग्रज घेऊन आले होते. आता चहा हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे आणि देशातील अनेक लोकांची सकाळ चहा प्याला शिवाय ताजीटवटवीत होत नाही. देशातील अनेक भागांमध्ये चहा शिवाय पाहुणचार पुर्ण झाला असे मानत नाहीत. घरात आलेल्या पाहुण्यांना चहा देण्याची प्रथा आहे.
चहाचा उद्योगही देशासाठी रोजगार आणि कमाईचे प्रमुख साधन बनले आहे. आज भारत जगातील सर्वात मोठा चहाचा उत्पादक असून भारत चहाची सर्वात मोठी बाजारपेठही आहे. चहा हे कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीच्या पानांपासून बनवले जाणारे पेय आहे. पाण्यानंतर हे जगातील दुसरे सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे.
भारतात चहाला मोठा इतिहास आहे, चहा पहिल्यांदा 19 व्या शतकात ब्रिटीशांनी देशात आणला होता. त्या काळी भारतात चहा हे सामान्यपणे वापरले जाणारे पेय नव्हते, तर कॉफी आणि इतर पेये अधिक लोकप्रिय होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 19व्या शतकाच्या सुरुवातीस चीनमधून चहा आयात करण्यास सुरुवात केली आणि चीनकडून चहा आणण्याऐवजी भारतातच चहाची लागवड करण्याचा निर्णय ब्रिटीशांनी घेतला. यामुळे कालांतराने भारताच्या पूर्वेकडील भागात, विशेषतः आसाम राज्यात मोठ्या चहाच्या बागांची निर्मिती करण्यात आली.