महाराष्ट्रातील राजकारणात अमिताभ बच्चन म्हणजे अजित पवार, कुणी उधळली स्तुतीसुमने?

अमिताभ बच्चन यांचा आवाज चालतो. त्यांचा फोटो, त्यांचा लूट चालतो. अमिताभ बच्चन यांचे ऑटोग्राफसुद्धा चालते. दादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे अमिताभ बच्चन आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणात अमिताभ बच्चन म्हणजे अजित पवार, कुणी उधळली स्तुतीसुमने?
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 7:53 PM

मुंबई : मंत्री दीपक केसरकर म्हणाले, अजित पवार यांच्याबदद्ल अतिशय आदर आहे. ते विरोधी पक्षाचे जबाबदार नेते आहेत. संजय राऊत यांच्यासारखे लोकं रोज बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. पण, अजित पवार बोलतात, तेव्हा लोकं त्याला सिरीअसली घेतात. त्यामुळे सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये अजित पवार आमच्यासोबत आघाडीवर असतात. अजित पवार यांनी सरकारमध्ये यावं, अशी आमची अपेक्षा आहे. ते सोबत आले तर आम्हाला आनंद होईल. कारण त्यांच्यासंदर्भात काय राजकारण घडतं हे अख्या महाराष्ट्राने बघीतले, अशी ऑफर दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना दिली.

अमिताभ चित्रपटात असावा असं सगळ्यांना वाटते

यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे बघा, अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटात असावा, असं सगळ्यांना वाटते. अमिताभ बच्चन यांचा आवाज चालतो. त्यांचा फोटो, त्यांचा लूट चालतो. अमिताभ बच्चन यांचे ऑटोग्राफसुद्धा चालते. दादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे अमिताभ बच्चन आहेत.

हे सुद्धा वाचा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारमध्ये यावं, अशी खुली ऑफर मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तर, अजित पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे म्हणाल्या. प्रत्येकाला वाटते अजित पवार सोबत असावेत, असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.

अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्याध्यक्ष केले नाही. उलट सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष करण्यात आले. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या वावड्या उठल्या. अजित पवार यांनी सरकारमध्ये यावं, अशी ऑफर मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी हे उत्तर दिलं.

चेहऱ्याला मत देणार की धोरणाला

चेहऱ्याला मत देणार की, धोरणाला. कारण सामाजिक न्यायाचा विभाग आहे. त्यात किती निधी आला. किती कार्यक्रम जाहीर झाले. एम्स झाले, असा गवगवा केला जातो. पण, त्यात किती डॉक्टर काम करतात, हेही महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात धोरणांना लकवा मारला आहे. पण, आता केंद्रामध्येही पॉलिसीला पॅरालीसीस झाला असल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.