देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट, मुंबईच्या जान शेखला राजस्थानमधून अटक, कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात

: दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केलं असून त्यांची उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती. अटक केलाल्या संशयितांमध्ये मुंबईत राहणाऱ्या एकाचा समावेश आहे.

देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट, मुंबईच्या जान शेखला राजस्थानमधून अटक, कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात
jan mohammad shaikh
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 3:38 PM

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बॉम्बस्फोट घडवण्याच्या मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी एकूण सहा संशय़ित दहशतवाद्यांना अटक केलं असून त्यांची उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती. अटक केलेल्या संशयितांमध्ये मुंबईत राहणाऱ्या एकाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याचे नाव समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh ) असून त्याला राजास्थानच्या कोटामधून अटक करण्यात आलंय. तो सायन वेस्टमधल्या एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता. (delhi police arrested six terrorist one is from sayan mumbai named jan mohammad shaikh police taken his family into custody)

संशयित दहशतवाद्याचे सायन परिसरात वास्तव्य

देशात सध्या सणांची धूम आहे. या पार्श्वभमीवर देशात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. हा कट दिल्ली पोलीस तसेच एटीसने उधळून लावला. पोलिसांनी एकूण सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केलं आहे. अटक केलेल्यांपैकी एक जण मुंबईतील सायन परीसरात वास्तव्यास होता. जान मोहम्मद शेख असे त्याचे नाव आहे. त्याला दिल्ली पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून अटक केलीय. शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जात होता. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख हा दाऊदचा भाऊ अनिस याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे.

जान मोहम्मद शेखचे कुटुंबीय पोलिसांच्या तब्यात

दहशतवादी हल्ल्याचा कट उघट झाल्यानंतर यामध्ये मुंबईतील जान मोहम्मद शेख सामील असल्याचे समोर आले. ही बाब समजताच सायन परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस जान शेखच्या घरी पोहोचले. तसेच पोलिसांनी घराची तपासणी करुन त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. सध्या जान शेखचे कुटुंबीय धारावी पोलीस ठाण्यात असून त्यांची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे धारावी पोलीस ठाण्यासमोर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

हल्ल्यासाठी शस्त्रांची जमवाजमव

दिल्ली पोलिसांनी एकूण सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केलं आहे. हे संशयित ISI च्या देखरेखीखाली भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. त्यासाठी अटक केलेले आरोपी शस्त्रास्त्रे तसेच दारुगोळा जमवत होते. मात्र, या घातपातची माहिती दिल्ली पोलीस स्पेशल सेल तसेच एटीएसला समजली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या एटीएससोबत उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये छापेमारी केली. तसेच येथे तीन संशयित आरोपींना पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दारुगोळा तसेच शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले आहेत.

सणांच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी हल्ला करण्याचा कट

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यातील दोन दहशतवादी डी- गँगशी संबंधित असल्याचीही माहिती मिळतेय. सध्या देशात सणांची धूम आहे. गणेशोत्सव, नवरात्री या सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची तयारी होती.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट, 6 संशयित ताब्यात, महाराष्ट्रही टार्गेटवर !

पुण्यात डिलिव्हरी बॉयची अश्लिल शेरेबाजी, रस्त्यावरच तरुणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न, महाराष्ट्रात चाललंय काय ?

लॉकडाऊनमुळे बेरोजगार, सुरु केला चक्क नोटांचा छापखाना, नाशिकमध्ये लाखो रुपये छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

(delhi police arrested six terrorist one is from sayan mumbai named jan mohammad shaikh police taken his family into custody)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.