आदित्य ठाकरेंना चार वेळा टोपी घालणारा भामटा, पाचव्यांदा अटक

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. राज्यभरात जनआशिर्वाद यात्रेतून (Janashirvada Yatra) ते राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, दुसरीकडे एका डिलिव्हरी बॉयने (Delivery Boy) तब्बल 4 वेळा टोपी फसवल्याचे समोर आले आहे.

आदित्य ठाकरेंना चार वेळा टोपी घालणारा भामटा, पाचव्यांदा अटक
Follow us
| Updated on: Sep 14, 2019 | 8:39 AM

मुंबई : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. राज्यभरात जनआशिर्वाद यात्रेतून (Janashirvada Yatra) ते राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, दुसरीकडे एका डिलिव्हरी बॉयने (Delivery Boy) तब्बल 4 वेळा टोपी फसवल्याचे समोर आले आहे. धीरेन मोरे (Dhiren More) असं या 19 वर्षीय आरोपी डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. खेरवाडी पोलिसांनी (Kherwadi Police) त्याला अटक केली.

आरोपी डिलिव्हरी बॉय धीरेन मोरेने आदित्य ठाकरे यांच्या नावाने स्वतःच वस्तू पार्सलच्या माध्यमातून मातोश्रीवर (Matoshri) पोहचवल्या. त्यानंतर मातोश्रीवर जाऊन वस्तू देत मोठी रक्कम वसूल केली. विशेष म्हणजे सुरुवातीला मातोश्रीवर ना कार्यकर्त्यांना संशय आला ना पोलिसांना. आरोपी डिलिव्हरी बॉयने तब्बल 4 वेळा मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरेंच्या नावे पैसे वसूल केले.

आरोपी धीरेन कमी किमतीच्या वस्तू पार्सलच्या माध्यमातून मातोश्रीवर पोहोचवायचा. मातोश्रीवर गेल्यावर तेथील कार्यकर्ते किंवा पोलिसांना फसवत मोठी रक्कम करत वसूल करायचा. इतक्या वेळा शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिसांना गंडवल्याने अनेकांना विशेष वाटले.

4 वेळा यश आल्यानंतर पाचव्यांदाही आरोपी धीरेनने हिंमत केली. मात्र, स्वतः आदित्य ठाकरेंनीच ऑनलाईन वस्तू मागवल्या नसल्याचा खुलासा केल्यानंतर त्याचं बिंग फुटलं. त्यामुळे पाचव्यांदा गंडा घालताना खेरवाडी पोलिसांनी आरोपी धीरेन मोरे याला अटक केली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.