Deonar Abattoir | मुंबईकरांची मटणाची चिंता मिटली, देवनार पशुवधगृह पुन्हा उघडणार

प्रायोगिक तत्वावर देवनार पशुवधगृह सुरु केला जात असल्याने महापालिकेच्या प्रमुख बाजारांमध्ये आता मटण उपलब्ध होणार आहे

Deonar Abattoir | मुंबईकरांची मटणाची चिंता मिटली, देवनार पशुवधगृह पुन्हा उघडणार
Follow us
| Updated on: Jun 29, 2020 | 8:51 AM

मुंबई : मुंबई महापालिकेचे देवनार पशुवधगृह पुन्हा एकदा खुले होणार आहे. येत्या शुक्रवार म्हणजे तीन जुलैपासून पशुवधगृहात शेळ्या-मेंढ्या आणण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता मटण सहज उपलब्ध होणार आहे. (Deonar Abattoir to begin Mumbaikars to taste Delicious Mutton Again)

प्रायोगिक तत्वावर पशुवधगृह सुरु केला जात असल्याने महापालिकेच्या प्रमुख बाजारांमध्ये आता मटण उपलब्ध होणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देवनार पशुवधगृह गेल्या तीन महिन्यांपासून बंद होतं.

देवनार पशुवधगृहात दर दिवशी दोन पाळ्यांमध्ये शेळ्या-मेंढ्या, डुक्कर तसेच मोठी जनावरे यांची कत्तल केली जाते. एका पाळीमध्ये 300 शेळ्या, 6 हजार बकरे, 300 डुक्कर आणि 300 मेाठी जनावरे कापली जातात.

हेही वाचा : Unlock 2 | ‘अनलॉक 2’मध्ये दोन किमीची ‘लक्ष्मणरेषा’, काय आहेत निर्बंध?

लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यास सुरुवात झाल्यानंतर देवनार पशुवधगृहाचे कामकाज सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत प्रायोगिक तत्वावर काम सुरु करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे.

काय आहे नियमावली?

-2 जुलैपासून सुरु होणाऱ्या देवनार पशुवधगृहात प्रत्येक व्यापाऱ्याने शेळ्या-मेंढ्या अशी जनावरे विक्रीला आणण्यासाठी मुख्य निरीक्षक (पशुधन) विभागातून आयात परवाना घेणे आवश्यक आहे. हा परवाना रविवार ते शनिवार या सात दिवसांसाठी वैध असेल.

-प्रत्येक दिवशी शेळ्या-मेंढ्यांसाठी फक्त 40 वाहनांना परवानगी असेल.

-या परवान्याचा वापर फक्त पशुवधगृहामध्ये शेळ्या-मेंढ्या (वध करण्यासाठी) आयात करण्यासाठी असेल. या परवान्यावर मुंबई शहरात इतरत्र जनावरे घेऊन जाता येणार नाहीत, असे पशवुधगृहाचे महाव्यवस्थापक योगेश शेट्ये यांनी स्पष्ट केले आहे.

-सध्या देवनार पशुवधगृहात एकाच पाळीमध्ये काम केले जाणार. एका पाळीत इतर वेळी कापल्या जाणाऱ्या जनावरांच्या 50 टक्के जनावरांची कत्तल केली जाणार आहे. दिवसाला 3 हजार बकरे, 150 शेळ्या, 150 डुक्कर आणि 150 मोठी जनावरे यांचे मटण मुंबईतील विविध परवानाधारक मटण विक्रेत्यांना पुरवले जाईल.

-मास्क, सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन कर्मचाऱ्यांकडून केले जाईल. तसेच आयात करणाऱ्या विक्रेत्यांनाही याचे पालन करणे बंधनकारक असेल

(Deonar Abattoir to begin Mumbaikars to taste Delicious Mutton Again )

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.