अजित दादा विरोधी पक्षनेत्यांना आपल्यासोबत घेऊन जातात तेव्हा… एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस पहातच राहिले

अजित पवार हे वडेट्टीवार यांना सत्ताधारी पक्षाच्या बाकाजवळ नेत असताना सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. नवीन विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा झाली आणि लगेच सत्तापक्षात आले अशा कोटी सुरु झाल्या.

अजित दादा विरोधी पक्षनेत्यांना आपल्यासोबत घेऊन जातात तेव्हा... एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस पहातच राहिले
LOP VIJAY VADETTIWAR
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 1:49 PM

मुंबई । 3 ऑगस्ट 2023 : विधानसभेचे पक्षनेते असलेले अजित पवार यांनी शिंदे – भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने आपला दावा सांगितला होता. विरोधी पक्षनेते कोण होणार याची जोरदार चर्चा सुरु असतानाच अखेर दिल्ली हायकमांडने कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिला. त्यांच्या नावाची घोषणा होताच विधिमंडळ गटाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले होते.

बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या पत्रामुळे विधानसभा सभागृहात काल त्यांच्या नावाची घोषणा होते. मात्र, आज प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. विरोधी पक्षनेते पदासाठी लागणारे निकष काँग्रेस पक्ष पूर्ण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या गटनेत्यांनी शिफारस केलेले विजय वडेट्टीवार यांचे नाव जाहिर करत आहे असे अध्यक्ष म्हणाले.

हे सुद्धा वाचा

विरोधी पक्षनेते म्हणून ज्या सोई सवलती मिळतात त्या त्यांना देण्यात येतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या आसनावर बसवावे असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. अध्यक्षांच्या या घोषणेनंतर मुख्यमनातरी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांच्याशी हस्तांदोलन केले. तर अजित पवार यांनी वडेट्टीवार यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना आपल्या बाजूला ओढले. त्याचवेळी मंत्री गुलाबराब पाटील पाठीमागून धावत आले आणि त्यांनी वडेट्टीवार यांच्याशी हात मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांनी दुर्लक्ष करत वडेट्टीवार यांना सत्ताधारी पक्षाच्या बाकाजवळ नेले.

अजित पवार हे वडेट्टीवार यांना सत्ताधारी पक्षाच्या बाकाजवळ नेत असताना सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. नवीन विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा झाली आणि लगेच सत्तापक्षात आले अशा कोटी सुरु झाल्या. वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या पहिल्या रांगेत बसलेले मंत्री भुजबळ, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. हे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेत्यांच्या खुर्चीवर नेऊन बसवले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.