“लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं कावीळ झाल्यासारखं वागणं अयोग्य”; सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या विरोधाला मोडीत काढलं
जुन्या सरकारच्या काळात नवीव संसद भवन बांधण्याची फक्त चर्चाच केली जात होती. मात्र नरेंद्र मोदी यांनी कमी वेळामध्ये हे संसद भवन भव्य दिव्य त्यांचे काम त्यांनी केला आहे. त्यामुळे आता जगासमोर भारताची ताकद आणखी वाढली आहे.
मुंबई : भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनच्या उद्घाटनावरून चाललेल्या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या नूतन संसद भवनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र त्यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांना कावीळ झाल्याचे म्हणत नरेंद्र मोदी यांना फक्त विरोध दर्शवण्यासाठी संसद भवनच्या उद्घाटनावर बहिष्कार घालण्याचे नाटक केले जात आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
संसद भवनच्या उद्घाटला न जाण्याचा विरोधकांनी निर्णय घेतला आहे, मात्र लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं कावीळ झाल्यासारखं वागणं अत्यंत अयोग्य आहे असा घणाघातही त्यांनी विरोधकांवर केला आहे.
नवीन संसद भवन हे या देशाची शान आहे, आणि या देशाची ताकददेखील आहे तरीदेखील विरोधकांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून जर असे प्रकार होत असतील तर हे विरोधाला विरोध करण्याचा प्रकार आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
जुन्या सरकारच्या काळात नवीव संसद भवन बांधण्याची फक्त चर्चाच केली जात होती. मात्र नरेंद्र मोदी यांनी कमी वेळामध्ये हे संसद भवन भव्य दिव्य त्यांचे काम त्यांनी केला आहे. त्यामुळे आता जगासमोर भारताची ताकद आणखी वाढली आहे. मात्र मोदीजींना विरोध करण्याचा विरोधकांचा ज्वर चढलेला असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
विरोधकांकडून लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जाणं होत नाही आणि त्याचं कारण हे नरेंद्र मोदी असं सांगितले जात असेल तर ते हास्यस्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हे कारण हास्यस्पद आहे कारण यापूर्वी 1975 साली लोकसभेच्या एनएक्स बिल्डिंगचा उद्घाटन स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांनी केले होते.
त्यावेळी ते काम लोकशाही विरोधी होते का, यापूर्वी संसदेच्या प्रसिद्ध ग्रंथालयाचे भूमिपूजनही स्वर्गीय राजीव गांधी यांच्याहस्ते केलं होते त्यावेळी ते काम लोकशाही विरोधी होतं का? असा सवालही त्यांनी विरोधकांना उपस्थित केला आहे.
मात्र विरोधकांचे वेगळेच कारण आहे कारण वर्षानुवर्ष नवीन संसद भवन बनवण्याची चर्चा होत होती, मात्र ते कोणीही बनवू शकले नाही ते आता नरेंद्र मोदी यांनी बनवून दाखवलं आहे त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे असा टोलाही त्यांनी हाणला आहे.