बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, दिग्गजांची उपस्थिती, पण अजित पवार कुठे होते?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. (Ajit Pawar Absent Balasaheb Thackeray Statue Inauguration)

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, दिग्गजांची उपस्थिती, पण अजित पवार कुठे होते?
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 10:27 PM

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या लोकार्पण सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. (Ajit Pawar Absent during Balasaheb Thackeray Statue Inauguration Programme)

सर्व पक्षातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीनंतर पाहणीसाठी ते त्याच दिवशी पोहोचले होते. त्यानंतर अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील विविध कामांचा आढाव घेऊन, आज ते बारामतीकडे रवाना होत आहे.

अजित पवार हे मुंबईत नसल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला हजर राहू शकले नाहीत. अजित पवार हे आज-उद्या बारामतीतच असतील. उद्या म्हणजे रविवारी 24 तारखेला सुपेगावात एका कार्यक्रमाला ते हजर राहणार आहेत.

कोण कोण उपस्थित?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.

श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात भव्य पुतळा

बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. 9 फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतरा सह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे. (Ajit Pawar Absent during Balasaheb Thackeray Statue Inauguration Programme)

संबंधित बातम्या : 

Balasaheb Thackeray Statue unveiled | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेचा श्रीमंत सोहळा

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.