दुचाकीवरील प्रवासाचे थ्रील, माधुरी नायक यांची मुलुखगिरी पुरुषांच्या प्रांतात

Madhuri Nayak | जीवनात काही हटके करण्याची जिद्द तुमचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. माधुरी नायक या अनेक तरुणींसाठी अशाच रोलमॉडल आहेत. त्यांनी पारंपारिक विचारांना छेद दिला. दुचाकीवरुन लांबचा पल्ला गाठला. दुचाकीवरुन एकटं फिरण्याचे स्वातंत्र्यच नाही तर थ्रील पण अनुभवले.

दुचाकीवरील प्रवासाचे थ्रील, माधुरी नायक यांची मुलुखगिरी पुरुषांच्या प्रांतात
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 1:38 PM

मुंबई | 9 March 2024 : महिलांनी घरातच थांबावे असा समाजाचा परंपरागत विचार आहे. पण अनेक महिला या विचारांना छेद देतात. मोटारसायकलवरुन दुरचा प्रवास हे तर महिलांसाठी स्वप्नच आहे. दुचाकीवरुन दुरचा प्रवास हा जणू पुरुषांचाच प्रांत होऊन बसला आहे. पण काही बाईक रायडर महिलांनी या विचारांना पुरता छेद दिला आहे. रस्त्यावरील दुचाकीवरुन प्रवासाचा थ्रील त्या अनुभवत आहेत. TV9 च्या कर्मचारी माधुरी नायक यांनी अशीच दुचाकीवरुन मुलुखगिरी केली आहे. त्या अनेक तरुणींसाठी रोलमॉडल ठरल्या आहेत.

स्वप्रेरणेचे इंधन

हे सुद्धा वाचा

माधुरी नायक या दक्षिणात्य कुटुंबातील. लोणावळा येथे त्यांनी आयुष्यातील मोठा काळ घालवला. लोण्यावळ्याच्या पर्वतराजींनी त्यांन नेहमी भुरळ घातली. त्यांनी Royal Enfield Meteor 350 बाईकवर आतापर्यंत अनेक ठिकाणाच्या बाईकिंगचा थरार अनुभवला. पण त्यांची आई काळजीपोटी त्यांना यासाठी नकार देत होती. पण माधुरी यांचे वडील त्यांच्या पाठिशी उभे ठाकले. त्यांनी त्यांची ही कल्पना उचलून धरली. त्यांनी प्रोत्साहन दिले. बाईकचा प्रवास हे माधुरी यांच्यासाठी केवळ एक थ्रील नाही तर स्वतःला सिद्ध करण्याचे आणि स्वातंत्र्य व्यक्त करण्याचे साधन आहे.

आम्ही सर्व बाईकर्स

‘खरंतर मी खुप लवकरच बाईक चालविणे शिकले. त्यानंतर स्वतःची बाईक खरेदी केली. हे स्वप्न पूर्ण होण्यासारखंच होते. या जगात तसा लिगंभेद नाही. आम्ही सर्वच बाईकर्स आहोत. आमचे या रस्त्यांवर प्रेम आहे. विशेष म्हणजे महिलांचा टक्का वाढत असल्याचा आनंद आहे.’ माधुरी नायक यांनी त्यांचे बाईक, रायडिंग आणि रस्त्यावरील प्रेम अशा शब्दात व्यक्त केले.

ही आव्हानंच तर प्रेरणा

बाईकिंग हे तसं तर पुरुषाचं क्षेत्र मानण्यात येतं. पण माधुरी यांनी या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या क्षेत्रात महिलांचा टक्का पण वाढत आहे. दुचाकीवरील थ्रील त्या अनुभवत आहे. महिला-पुरुष असा कोणताही भेद न करता, बाईकर्स त्यांचे पॅशन जपत आहेत. दूरचा प्रवास या पॅशनमुळे अगदी सहज आणि सोप्पा होऊन जातो. हे दुचाकीवरील प्रेमच त्यांचे जग झाले आहे. अनेक तरुणींसाठी माधुरी नायक या रोल मॉडल ठरल्या आहेत.

'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.