सीएसएमटी ते मडगांव ( गोवा ) वंदेभारतचे वेळापत्रक आले, किती आहेत थांबे ?

मुंबई ते गोवा मार्गावर वंदेभारत एक्सप्रेसला दहा थांबे देण्यात आले आहेत. ही ट्रेन आठ तासांत मडगांव मुक्कामी पोहचणार आहे. या गाडीचे तिकीट तेजसपेक्षा महाग आहे.

सीएसएमटी ते मडगांव ( गोवा ) वंदेभारतचे वेळापत्रक आले, किती आहेत थांबे ?
Vande_Bharat_Express_around_MumbaiImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 7:34 PM

मुंबई : मुंबई ते गोवा अशी कोकण मार्गावरील वंदेभारतची ( vande bharat express ) उद्घाटनाची पहिली फेरी 3 जून रोजी मडगांव जंक्शनपासून सुरू होणार आहे. ही ट्रेन नियमित वेळापत्रकानूसार सीएसएमटीहून सकाळी लवकर 5.25 वाजता सुटणार आहे. या ट्रेनला आठ डबे असणार असून एकूण 10 थांबे असणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी या ट्रेनच्या नियमित फेऱ्या 4 जूनपासून सुरू होणार आहेत. मुंबई ते गोवा हे 586 किमीचे अंतर ही ट्रेन सुमारे आठ तासांत कापणार आहे. या मार्गावरील ‘तेजस एक्सप्रेस’ला 8 तास 50 मिनिटे घेत असल्याने वेगवान वंदेभारतने एका तासांची बचत होणार आहे.

कोकण मार्गावर सोळा डब्यांच्या ऐवजी आठ डब्यांची वंदेभारत चालविण्यात येणार आहे. सध्या या मार्गावरील जलद ट्रेन तेजस एक्सप्रेस मुंबई ते मडगाव प्रवासाला 8 तास 50 मिनिटे घेते. सेमी हायस्पीड वंदेभारत हेच अंतर 7 तास 50 मिनिटे घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा एक तास वाचणार आहे. वंदेभारत ही विना इंजिनाची वीजेवर धावणारी मेट्रोच्या धर्तीची ट्रेन असल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणार आहे.

गोवा ( मडगांव ) ते मुंबई वंदेभारतला पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखविणार आहेत. तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि गोव्याचे मुख्यमंत्री मडगांव येथील मुख्य सोहळ्याला हजर असणार आहेत.

असे आहे वेळापत्रक

सीएसएमटीहून ही ट्रेन सकाळी 5.25 वा., दादर स. 5.32 वा., ठाणे स. 5.52 वा., पनवेल स. 6.30 वा., रोहा स. 7.30 वा., खेड स. 8.24 वा., रत्नागिरी  स. 9.45 वा., कणकवली स. 11.20 वा. थिविम दु.12.28 वा. आणि मडगांव दु.1.15 वा. असे तिचे वेळापत्रक असेल. तर मडगांवहून परतीच्या प्रवासाची गाडी मडगांव दु.2.35 वा., थिविम दु. 3.20 वा., कणकवली दु.4.18 वा., रत्नागिरी सायं.5.45 वा., खेड रात्री 7.08 वा., रोहा रा. 8.20 वा., पनवेल रा.9 वा., ठाणे रा. 9.35 वा., दादर रा.10.05 वा. तर सीएसएमटी रा.10.25 वा. असे वंदेभारतचे मान्सून पर्व वेळापत्रक ठरले आहे. वंदेभारत शुक्रवार वगळता आठवड्याचे सहा दिवस धावणार आहे.

तेजसपेक्षा जास्त भाडे

वंदेभारत एक्सप्रेस जरी दर ताशी 160 किमीच्या वेगाने धावणारी असली तर कोकणात मात्र 586 किमीचे अंतर ती सरासरी 74.84 किमीच्या वेगाने धावणार आहे. या वंदेभारतच्या भाडे जाहीर केलेले नसले तरी ते या मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसच्या पेक्षाही जास्त असणार आहे. या ट्रेनला सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम, मडगाव असे थांबे असणार आहेत.

csmt to madgoan vande bharat time

csmt to madgoan vande bharat time

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.