दिया मुझे जो तूने है , वो कम लगे जरा जरा…. अमृता फडणवीसांचं ट्विट

| Updated on: Mar 29, 2021 | 3:41 PM

अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. | Devendra Fadnavis Amruta Fadnavis holi 2021

दिया मुझे जो तूने है , वो कम लगे जरा जरा.... अमृता फडणवीसांचं ट्विट
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी मुंबईतील घरी धुलिवंदनाचा आनंद लुटला.
Follow us on

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात धुलिवंदनाच्या सणावर राज्य सरकारने निर्बंध लादले आहेत. याचे भान राखत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मुंबईतील घरी धुलिवंदनाचा आनंद लुटला. यानंतर अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांची मुलगीही दिसत आहे. अमृता फडणवीस यांनी या ट्विटसोबत कवितेच्या काही ओळीही लिहल्या आहेत. (Devendra Fadnavis and Amruta Fadnavis celerbrtion holi 2021 in Mumai)

दिया मुझे जो तूने है ,
वो कम लगे जरा जरा !
बेरंग-सी इस राह में ,
कुछ रंग भरे जरा जरा !

अतरंगी नहीं तो ना सही ,
सतरंगी बने जरा जरा !

मुंबईत धुळवड खेळायला गेलात तर पोलिसांकडून कारवाई होणार

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारकडून होळी (Holi 2021) आणि धुळवडीच्या सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा मुंबईत नेहमीप्रमाणे धुळवड साजरी करता येणार नाही. यानंतरही नागरिकांनी ऐकले नाहीच तर त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल. (Holi Rangpanchmi festival in Mumbai rules and regulations)

अर्थात धुळवड घरातल्या घरात खेळता येईल पण चाळ किंवा इमारतीच्या आवारात सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आखून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रसंगी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे.

काय आहेत नियम?

होळी, धुळवडीला सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. पालिकेने दोनच दिवसांपूर्वी तसे आदेश जाहीर केले आहेत. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथके तयार क ली आहेत. ही पथके फिरतीवर राहतील व तपासणी करतील. एखाद्या ठिकाणी नियमभंग होतो आहे असे आढळले तर समज दिली जाईल. मात्र त्यानंतरही लोकांनी ऐकले नाही तर पोलिसांची मदत घेतली जाईल व कारवाई केली जाईल.

संबंधित बातम्या:

Holi 2021: कोरोनाच्या निर्बंधांमुळे नागरिकांकडून घरात सेलिब्रेशन; चिकन-मटणाच्या खरेदीसाठी दुकानांबाहेर रांगा

होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, हिंदू विरोधी ठाकरे सरकारचा निषेध: भातखळकर

Maharashtra lockdown update : राज्यात लॉकडाऊनची दाट शक्यता, सरकारकडून कोणती खबरदारी?

(Devendra Fadnavis and Amruta Fadnavis celerbrtion holi 2021 in Mumai)