“नाशिकमध्ये दुसऱ्यांसाठी खड्डे खोदताना नागपुरात दुर्लक्ष”; ठाकरे गटानं भाजपला केलं टार्गेट…
नागपूर आणि नाशिकच्या जागांबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ती जागा भाजपची नव्हती, तिथं जर भाजप पूर्ण ताकदीने लढली असते तर भाजप शंभर टक्के विजयी झाली असते.
मुंबईः देवेंद्र फडणवीस आणि टीम भाजप हे नेहमी समोरच्याला तुच्छ लेखत असतात. त्यांनी नेहमीच शिवसेनेला किंचित सेना, शिल्लक सेना म्हणून हिणवत आले आहे. त्याच बरोबर त्यांनी जसं शिवसेनेला वाटेल तशी टीका करत आले आहेत. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी पप्पू म्हणूनही त्यांच्याकडून दर्पोक्ती करण्यात आली आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातही त्यांनी तिच नीती वापरत समोरच्या प्रतिपक्षालाही त्यांनी तुच्छ लेखले म्हणून त्यांनी नाशिकच्या जागेसाठी मोठा खड्डा खोदला होता,
मात्र त्याचवेळी नागपूरसाठी मात्र त्यांनी आपल्यासाठी मोठा खड्डा खोदला होता अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
नागपूर आणि नाशिकच्या जागांबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ती जागा भाजपची नव्हती, तिथं जर भाजप पूर्ण ताकदीने लढली असते तर भाजप शंभर टक्के विजयी झाली असते.
त्यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, भाजप आता आपली सोयीची बाजू मांडत आहे. सुषमा अंधारे यांनी यावेळी भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांना किंमत होती,
आता चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत तरीही आता देवेंद्र फडणवीस यांनाच किंमत आहे त्यावरून आता भाजपमधील राजकारण समजून घ्यावं अशी खोचक टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या युतीविषयी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, या युतीचा जो कार्य निर्णय असेल तो पक्षप्रमुख ठरवणार आहेत. त्यामुळे त्या निर्णयाबद्दल मी काही सांगू शकत नाही अशी माहितीही त्यांनी यावेळी सांगितली.