Devendra Fadnavis | ‘ललित पाटील याला उद्धव ठाकरेंनी…’; ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा!
Devendra Fadnavis on Lalit Patil Case : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटील प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ललित पाटील याचं कनेक्शन समोर आणलं आहे.
मुंबई : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये रोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. ललित पाटील याने कॅमेरासमोर आल्यावर आपल्याला ससून हॉस्पिटलमधू पळवून नेल्याचं सांगितलं होतं. अशातच या प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. ललित पाटील हा शिवसेनेचा शहरप्रमुख असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. इतकंच नाहीतर फडणवीसांनी एक सवाल करत तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
ललित पाटील याला डिसेंबर २०२० ला अटक झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ललित पाटीलला नाशिक शिवसेना प्रमुख होते. ललित पाटील याला अटक झाल्यानंतर पीसीआर मागितला, गुन्हा मोठा असल्याने १४ दिवसाचा पीसीआर मिळाला. पीसीआर मिळताच ते ससूनला अॅडमिट होते. त्यावेळी सरकारी पक्षातर्फे कोर्टाला अर्ज केला नाही की यांच इंट्रोगेशन केलं नाही. शेवटी काही केलं नाही तर त्यांचा एनसीआर करून टाकला. त्यामुळे माझा सवाल आहे की ललित पाटील याची चौकशी का करण्यात आली नाही? कोणाचा दवाब होता, मुख्यमंत्री जबाबदार होते की गृहमंत्री कोणाचे संबंध होते ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ललित पाटील याचे मोठ्या नेत्यांसोबत राजकीय कनेक्शन आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. ललित पाटील नाशिक शिवसेना प्रमुख असल्याने त्याची चौकशी झाली नाही का? असंही फडणवीस म्हणाले. आता कोणाची नार्को टेस्ट करायची ते तुम्हीच बघा असा प्रतिसवाल फडणवीसांनी पत्रकारांना केला.
दरम्यान, शिक्षक कंत्राटी भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली होती. शिक्षक कंत्राटी भरतीच्या संदर्भात पहिला निर्णय 2003 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात झाला आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 2010 साली पहिला जीआर काढला त्यानंतर आणखी एक जीआर ६ हजार पदांच्या भरतीचा काढण्यात आला. यामध्ये शिक्षक भरतीचा जीआर काढण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.