Sahitya Sammelan: कुबेरांवरील शाईफेकीचं दरेकरांकडून समर्थन, तर फडणवीस म्हणतात, शाईफेकीचं कृत्य अयोग्य

नाशिकच्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडने शाईफेकली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या या कृत्याचे समर्थन केलं आहे.

Sahitya Sammelan: कुबेरांवरील शाईफेकीचं दरेकरांकडून समर्थन, तर फडणवीस म्हणतात, शाईफेकीचं कृत्य अयोग्य
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 3:54 PM

मुंबई: नाशिकच्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडने शाईफेकली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या या कृत्याचे समर्थन केलं आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे कृत्य चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. या घटनेबाबत भाजपच्या दोन्ही नेत्यांनी परस्पर विरोधी विधाने केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेकण्यात आल्याचं समजल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचं केंद्रं असतं. तुम्हाला जर दुसरी अभिव्यक्ती व्यक्त करायची असेल तर दुसर कुठेही करता येते. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरेकरांकडून समर्थन

दरम्यान, संभाजी ब्रिगेडने केलेल्या या कृत्याचं प्रवीण दरेकर यांनी समर्थन केलं आहे. आम्ही काही संभाजी ब्रिगेडच्या लोकांना शाई फेकायला सांगितली नाही. पण ती त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे. त्यांना वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती. लिखाण करता आलं असतं. पण प्रत्येकाची पद्धत असते. काही लोक लेखणीतून वार करतात. संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे. त्यामुळे त्यांनी लेखणीपेक्षा अशा गोष्टींना महत्व दिलं असेल. छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपाहार्य लिहिलं गेलं असेल आणि शाई फेकली असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजही आमचं दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणी लिहित असेल बोलत असेल तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस सहन करणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला आहे.

भुजबळांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

दरम्यान, नेमका काय प्रकार घडला याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. गिरीश कुबेर यांनी आधी गोल्फकार्टमधून संमेलन स्थळाची पाहणी केली. मी आणि माझा मुलगा त्यांना स्वत: घेऊन फिरलो. संमेलनस्थळापर्यंत तुमच्यासोबत येतो असं मी कुबेरांना सांगितलं. त्यावर ते नको म्हणाले. अशी काही घटना घडेल याची सकाळपासून कुणकुण होती. संभाजी ब्रिगेडचा त्यांच्याशी काही तरी वाद आहे. पण संभाजी ब्रिगेड त्यांना निवेदन देऊन आपलं म्हणणं मांडतील असं वाटत होतं. पुण्यातून दोनजण मोटारसायकलवरून आले. त्यांनी काळी पावडर कुबेर यांच्या अंगावर फेकली. व्यासपीठाजवळील प्रवेशद्वाराजवळ वाहन स्लो झालं आणि या दोघांनी त्यांच्यावर काळी पावडर फेकली. पंकज भुजबळ यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत हे लोक काळी पावडर फेकून पळून गेले. या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Girish Kuber | ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक, नाशकात साहित्य संमेलन परिसरात प्रकार

साहित्य संमेलनाला आलेल्या दोघांना कोरोनाची लागण, साहित्य नगरीत खळबळ; दोघांना माघारी पाठवले

पक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.