उद्धवजी, ‘त्या’ दोन निर्णयांबद्दल तुमचं जाहीर अभिनंदन : देवेंद्र फडणवीस

सीएएला पाठिंबा दिल्याबद्दल आणि एल्गार परिषद प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे सोपवल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं जाहीर अभिनंदन केलं.

उद्धवजी, 'त्या' दोन निर्णयांबद्दल तुमचं जाहीर अभिनंदन : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 24, 2020 | 8:52 AM

मुंबई : भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसताना चक्क वेगळचं चित्र पाहायला मिळालं. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं. उद्धव यांनी घेतलेल्या दोन निर्णयांबद्दल फडणवीसांनी कौतुक केलं.(Devendra Fadnavis Congratulates CM)

सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) ला पाठिंबा दिल्याबद्दल आणि एल्गार परिषद प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं जाहीर अभिनंदन केलं.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सरकारच्या चहापानावर विरोधीपक्ष भाजपने बहिष्कार टाकला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षाची भूमिका मांडली. महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवतानाच उद्धव ठाकरेंचं दोन गोष्टींसाठी अभिनंदन करायला फडणवीस विसरले नाहीत.

हेही वाचा : मराठा तरुणांचं 27 दिवसांपासून आंदोलन, अद्यापही नियुक्त्या न होणं हे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

‘कोरेगाव-भीमा आणि एल्गार परिषद हे वेगवेगळे नसल्याचं आतापर्यंतच्या तपासात पुढे आलं आहे. तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणंच योग्य आहे’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, जनगणनेचा कायदा कठोर आहे. प्रश्नावली ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे, असं म्हणत फडणवीसांनी ‘सीएए’ला पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव यांचे आभार मानले.

‘सीएए’ला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दर्शवला असला, तरी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचा त्याला विरोध आहे. तर एल्गार परिषदेची ‘एसआयटी’ चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आग्रही आहेत. ‘एनआयए’कडे तपास सुपूर्द करण्यावरुन पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.(Devendra Fadnavis Congratulates CM)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.