Devendra Fadnavis: ही हिंमत, अजित पवारांबद्दल, तीही पुण्यात? फडणवीसांनी ती घटना पुन्हा सभागृहात सांगितली

अजित पावारांसोबत काय प्रकार घडला सांगताना, राज्यात घडणाऱ्या गुन्ह्याचाही पुरता हिशोब काढला. मुंबई ते बारामती व्हाया पुणे, फडणवीसांनी एक ना एक प्रकरण उकरून काढलं.

Devendra Fadnavis: ही हिंमत, अजित पवारांबद्दल, तीही पुण्यात? फडणवीसांनी ती घटना पुन्हा सभागृहात सांगितली
फडणवीसांनी गुन्हेगारीवर सडकून टीका केलीImage Credit source: Vidhansabha
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 7:29 PM

मुंबई : आज विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं (Cm Uddhav Thackeray) भाषण संपताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उभा राहिले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा तर समचार घेतलाच, मात्र त्यांनी कोविड काळातल्या भाष्ट्राचाराची भली मोठी यादी वाचून दाखवली. याच वेळी अजित पावारांसोबत काय प्रकार घडला सांगताना, राज्यात घडणाऱ्या गुन्ह्याचाही पुरता हिशोब काढला. मुंबई ते बारामती व्हाया पुणे, फडणवीसांनी एक ना एक प्रकरण उकरून काढलं. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या फोन नंबरचा वापर करत खडणी मागितली होती. त्याचाही हिशोब फडणवीसांनी पुन्हा काढला. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचा नंबर वापरून बनाव रचला आणि खंडणी (Fake Call) मागितल्या प्रकार समोर आला होता. त्यात पोलिसांनी तातडीने कावाईही केली होती. मात्र इतर गुन्ह्यांचा पाढा वाचताना फडणवीसांनी तेही काढलं.

पुण्यातलं नेमकं प्रकरण काय?

पुण्यातल्या काही गुन्हेगारांनी अजित पवारांच्या मोबईलचा वापर करत तब्बल दहा लाखांची खंडणी मागिल्याने सगळीकडे खळबळ माजली होती. त्यात ज्याला खंडणी मागितीतली त्याने त्या गुन्हेगारांना दोन लाख रुपये दिलेही होती. मात्र पोलिसांनी हा प्रकार समोर आल्यानंतर तातडीने अलर्ट मोडवर येत काही जणांना अटक केली. आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणा गुन्हेगारांची हिंम्मत थेट उपमुख्यमंत्र्यांच्या नंबरचा वापर करण्यापर्यंत पोहोचली म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल चढवला. फडणवीसांनी एवढच प्रकरण काढलं नाही. फडणवीसांनी बारामती कनेक्शन सांगत माजी पोलीस अधिकारी इसाक बागबान यांच्याबद्दलचा पेनड्राईव्हही सादर केला.

दुसरा पेनड्राईव्ह सादर

आपल्या मुंबई पोलीस दलातील एक सेवानिवृत्त डीसीपी इसाक बागवान म्हणून आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते. त्यांना काही पुरस्कारही मिळाले आहेत. आता त्यांच्या बंधूंनी त्यांच्याबाबत एक तक्रार केलीय. त्यांचं बारामती कनेक्शन आहे पण अजितदादांशी त्यांचा काही संबंध नाही. हे सेवेत असताना मोठ्या प्रमाणात सपत्ती यांनी जमा केली. एकट्या बारामतीत यांनी गट क्रमांक 69 मधील 42 एकर NA जमीन आहे त्यांच्याकडे. दादांचीही एवढी जमीन नसेल. बारामती पासून ते मुंबईतील संपत्तीपर्यंतच्या संपत्तीची माहिती मी तुम्हाला देतो, असं फडणवीस म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.