Devendra Fadnavis : आता सर्व सण जोरात करायचे, मुख्यमंत्री घरी बसणार नाही अन् तुम्हालाही बसू देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

भाजपा मुंबई (Mumbai BJP) कार्यकर्ता मेळावा आणि नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार तसेच नूतन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली.

Devendra Fadnavis : आता सर्व सण जोरात करायचे, मुख्यमंत्री घरी बसणार नाही अन् तुम्हालाही बसू देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
भाजपा मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीसImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 1:49 PM

मुंबई : आपले सरकार आल्यानंतर काय घडते, हे सर्वांनी पाहिले आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. आता मुख्यमंत्री घरी बसणार नाही आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. सर्व सण आता जोरात आणि उत्साहात साजरी होतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. लक्ष्य 2022 मुंबई ध्येयपूर्ती..! भाजपा मुंबई (Mumbai BJP) कार्यकर्ता मेळावा आणि नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार तसेच नूतन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यानिमित्ताने त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक (BMC election 2022) प्रचाराचा नारळही फोडला. मुंबई महापालिकेवर भगवा फडवायचा आहे, असा निश्चय त्यांनी केला.

‘हीच आपली परंपरा’

फडणवीस म्हणाले, की तुम्ही कालची मुंबई पाहिली का? तीच परंपरा, संस्कृती ही आपली परंपरा आहे. आपले सरकार आल्यावर काय घडते हे सर्व सर्वांनी पाहिले. आता सर्व जोरात करायचे आहे. गणेशोत्सव जोरात, नवरात्र जोरात, दिवाळी जोरात, आंबेडकर जयंती जोरात आणि शिवजयंतीही जोरात. आता सर्व जोरात करायचे आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार या आपल्या दोन कार्यकर्त्यांचा आपण सत्कार केला. मंगल प्रभात लोढा यांनी तीन वर्ष समर्थपणे मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. कोरोनाच्या काळातही चांगल्या अॅक्टिव्हिटी केली. एकही दिवस भाजपा शांत बसला नाही. वेगवेगळ्या मोर्चाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणलं. या मुंबई भाजपाला लोढा यांनी बहुजन आणि सर्वव्यापी चेहरा दिला, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

‘मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराचा विळखा;

शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, की मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा मोठा विळखा पडला आहे. किरीट सोमैयांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली. आपल्या टीमनेही घोटाळे काढले. मुंबईत दरवर्षी पाणी तुंबलेले असते. मुंबईत तेच रस्ते आणि तेच खड्डे असतात. इतर शहरात सिमेंटच्या रस्त्याावर कधीच खड्डे पडत नाही. पण मुंबईत खड्डे पडत असतात. मुंबईची अवस्था बदलायची असेल तर प्रकल्प 15 वर्षांपासून सुरू आहे. हे प्रकल्प काही लोकांची दुभती गाय आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मलई खाण्याचे काम केले जात आहे, असे ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.