Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्या ‘कलंक’ या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले, परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे

अशा मानसिकतेतून एखादा व्यक्ती बोलत असेल तर आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ही मानसिक परिस्थिती आहे.

उद्धव ठाकरे यांच्या 'कलंक' या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले, परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 4:04 PM

नागपूर : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी विदर्भात दौरा केला. नागपुरात सभा घेतली. यावेळी ठाकरे यांनी नागपूरला लागलेला कलंक असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांचा केला होता. त्यावर प्रतिक्रिया न दिलेली बरी असं म्हणून देवेंद्र फडणवीस निघून गेले. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, दुःख आहे की आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर विपरीत परिणाम झाल्याचं दिसतं. त्यामुळे त्यांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशा मानसिकतेतून एखादा व्यक्ती बोलत असेल तर आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ही मानसिक परिस्थिती आहे. त्यावर प्रतिक्रिया न दिलेली बरी.

पक्षांतर करा नाहीतर जेलमध्ये जा

अफजलखानाच्या काळात धर्मांतर करा, यासाठी सक्ती केली जात होती. धर्मांतर करा नाहीतर कुटुंबासह मारले जालं, अशी परिस्थिती होती. तसं आता पक्षांतर करा नाहीतर जेलमध्ये जाल. अशी भाजपची प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती देशाला आणि राज्याला कलंकासारखी लावू नका. हीच मला त्यांना विनंती असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

कलंक या शब्दावर उद्धव ठाकरे ठाम

कलंक या शब्दावर उद्धव ठाकरे ठाम आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप लावून कलंक लावता, मग मंत्री करता. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा निशाणा साधला आहे. तुम्ही घराघरात ईडी, सीबीआय घुसवता तेव्हा ते कुटुंब कलंकित होत नाही का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्री झालेत, हे मिंध्येंच्या नाकीनऊ आलेत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणणाऱ्यांना आता मिरचीही गोड लागते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.