मुंबईः मुंबई-सूरत-गुवाहाटा-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करणाऱ्या बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) नाट्यनंतर आता हा बंडखोरीचा प्रवास समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. गोव्याहून एकनाथ शिंदे मुंबईमध्ये पोहचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले. एका सच्चा शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले म्हणून आनंद साजरा होत असतानाच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले होते, की मी मंत्री मंडळाच्या बाहेर असेन.
भाजपा ने महाराष्ट्र की जनता की भलाई के लिए बड़े मन का परिचय देते हुए एकनाथ शिंदे जी का समर्थन करने का निर्णय किया। श्री देवेन्द्र फडणवीस जी ने भी बड़े मन दिखाते हुए मंत्रिमंडल में शामिल होने का निर्णय किया है, जो महाराष्ट्र की जनता के प्रति उनके लगाव को दर्शाता है।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) June 30, 2022
या वक्तव्यानंतर अनेकांना धक्का बसला मात्र काही वेळातच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि भाजपच्या अध्यक्षांनी ट्विट करत देवेंद्र फडणवी उपमुख्यमंत्री (deputy chief minister) होणार असल्याचे ट्विट केले. जे. पी. नड्ड् आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या या ट्विटमुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.
भाजपा अध्यक्ष श्री @JPNadda जी के कहने पर श्री @Dev_Fadnavis जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है।
यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है। इसके लिए मैं उन्होंने हृदय से बधाई देता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) June 30, 2022
एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मी मंत्री मंडळाच्या बाहेर असेन. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक जणांना धक्का बसला. मात्र हा धक्का जास्त काळ न राहता भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीही मोठ्या मनाने मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळेच त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची किती ओढ आहे हेही दिसून आले असंही त्यांनी ट्विट केले.
देवेंद्र फडणवीस यांनी मी मंत्रिमंडळाच्या बाहेर असेन सांगताच अनेकांना तो धक्का होता. मात्र त्यानंतर काही वेळातच भाजपच्या जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांनी ट्विट करत त्यांना उपमुख्यमंत्री होण्याचा त्यांनी निर्णय घेतला असल्याचे सांगत त्यांचे त्यांनी अभिनंदनही केले. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या या ट्विटमुळे भाजपममधील वाद उफाळून आ्ल्याचे दिसून आले आहे.
अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्या ट्विटमुळे आता महाराष्ट्रातील राजकारणात आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंडळात सहभागी होणार नाही असं घोषीत केल्यानंतर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांचीही नावं चर्चेत आली होती, मात्र आता देवेंद्रफडणवीस यांनी आपण उपमुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितल्यानंतर ही दोन नावं बाजूला पडली असल्याचे दिसत आहे. पंकजा मुंडे यांच्याही नावाची चर्चा होती मात्र या एका निर्णयामुळे आता मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.