‘मनोज जरांगे सागर बंगल्यावर आले तर…’; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. याआधी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी मनोज जरांगे यांच्या सागर बंगल्यावर येण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'मनोज जरांगे सागर बंगल्यावर आले तर...'; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 8:25 PM

मुंबई : मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस  यांनी षडयंत्र रचले आहे. माझ्या सलाईनमधून मला मारायचा प्रयत्न झाल्याचाही आरोप जरांगेंनी केला. जरांगे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येणार आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

सागर बंगला हा सरकारी आहे. कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं.कोणाचीही अडवणुक नाही. कुठल्या निरशेतून ते बोलत आहेत, कोणती सहानुभूती हवी आहे ते मला माहिती नाही. ते जे बोलले ते बिन बुडाचे आरोप असून धादांत खोटं आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे. मी मराठा समाजासाठी काय केलं? सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळ ही सुरु केली. सर्व योजनांची सुरूवात मी केल्याचं फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षण हाय कोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात सुध्दा टिकवलं. त्यामुळे कोणी बोललं म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब बोलत होते. तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलता आहेत हा प्रश्न आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सरकारने संयम ठेवलेला आहे, आमचा अंत पाहू नका- मुख्यमंत्री

जी मागणी केली होती त्यानुसार आम्ही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलेला शब्द पाळला आहे. आता आरक्षण दिल्यावर मागणी बदलणं म्हणजे तुम्ही राजकारण करू लागले आहात. मनोज जरांगे यांना कोणाचंही ऐकू नये, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही कृत्य करू नये. सरकारने संयम ठेवलेला आहे अंत पाहू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.