उद्धवजी बदलले, पण इतके? 25 वर्षे सोबत होतो याचं वाईट वाटतंय : देवेंद्र फडणवीस

महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही.

उद्धवजी बदलले, पण इतके? 25 वर्षे सोबत होतो याचं वाईट वाटतंय : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 6:57 PM

मुंबई: महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात उभे करण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपचे सरकार असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार कायदा केला. हे करताना ओबीसी समजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावण्यात आला नव्हता. मात्र, आताच्या सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. लोकांची समजूत काढता येत नाही म्हणून त्यांच्यात संभ्रम पसरवला जात आहे. यामधूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे मग ओबीसींच्या कोट्यातून द्यायचे का, अशी नवी टूम काढण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis on Maratha Reservation)

आज मुंबईत भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. तसेच मराठा आंदोलकांचा उद्रेक अगदी योग्य असल्याचेही सांगितले. आंदोलनं ही चर्चेच्या माध्यमातून सुटतात. राज्यकर्त्यांना कायदा करण्याचे अधिकार विधिमंडळाने दिले आहेत. मात्र, महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

उद्धवजी बदलले, पण इतके? 25 वर्षे सोबत होतो याचं वाईट वाटतंय : देवेंद्र फडणवीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे खुली करण्यास सरकारने अद्याप परवानगी न दिल्याच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच चिमटे काढले. राज्य सरकारला मंदिरापेक्षा मदिरा महत्त्वाची वाटत आहे. मंदिरांमुळे कोरोना वाढतो, पण मदिरेमुळे नाही, असे त्यांना वाटते. ही सगळी परिस्थिती पाहता खरंच सरकारचं डोक ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

मान्य आहे उद्धवजी तुम्ही बदलले असाल पण एवढं कस बदललात? तुम्ही हिंदुसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवताय ना मग हे काय? गेली २५ वर्ष तुमच्यासोबत होतो याचं वाईट वाटतंय. नवीन मित्र काय मिळाले तुम्ही सगळंच विसरून गेलात. पण आम्हाला सरकारला वठणीवर आणता येते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संंबंधित बातम्या:

मराठा समाजाच्या 10 तारखेच्या महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर

Bihar Election : शिवसेनेने हिंदुत्व सोडले, भाजपला बिहारमध्ये फरक पडणार नाही, भाजप खासदाराचा निशाणा

(Devendra Fadnavis on Maratha Reservation)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.