पवारांपेक्षा ‘या’ नेत्याने माझा सर्वात मोठा विश्वासघात केला, फडणवीसांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली!

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सतास्थापेनविषयी शरद पवार यांना माहिती असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगत शपथविधीची आठवण सर्वांना करून दिली आहे. इतकंच नाहीतर फडणवीसांनी विश्वासघात करणाऱ्या नेत्याचं नाव सांगितलं आहे.

पवारांपेक्षा 'या' नेत्याने माझा सर्वात मोठा विश्वासघात केला, फडणवीसांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली!
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 7:35 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खळबळ उडवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात मुलाखत दिली. यामध्ये बोलताना त्यांनी ज्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला होता त्याबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. पहाटेच्या शपथविधीवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी सत्तास्थापनेच्या रेसमधून शिवसेना आणि काँग्रेस नॉक आऊट झाल्यासारखं चित्र निर्माण झालं होतं. अजित पवार यांचं बंड फार काही काळ टिकलं नव्हतं मात्र फडणवीसांना सोबत घेत त्यांनी राष्ट्रपती राजवट घालवली होती.

या राजकीय समीकरणाबाबत शरद पवार यांना माहिती असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगत शपथविधीची आठवण सर्वांना करून दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे या सत्तास्थापनेबद्दल शरद पवार यांना माहिती असल्याचं उघड नव्हतं. इतकंच नाहीतर फडणवीसांनी विश्वासघात करणाऱ्या नेत्याचं नाव सांगितलं आहे.

अजित पवार यांनी फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं मात्र बंड फुटल्यामुळे सरकार फार काही काळ टिकलं नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस आणि शिवसेनेला हाताशी घेत महाविकास आघाडी सरकार बनवण्याची पूर्ण तयारी केली होती. अजित पवार काही काळ नॉट रिचेबल राहिले नंतर पुन्हा परत येत महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यावेळी फडणवीसांची चाल अयशस्वी ठरली होती. कारण शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची अडीच वर्षे मागितल्यामुळे युती तुटली आणि अजित पवारांसोबत जात स्थापन केलेलं सरकारही टिकलं नव्हतं.

देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीमध्ये बोलताना, सर्वात मोठा विश्वासघात हा पवारांनी नाहीतर उद्धव ठाकरे यांनी केल्याचं सांगितलं. माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे विश्वासघात त्यांनी केला.

दुसरा विश्वासघात आमच्यासोबत केला त्यांना मी कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा पुढे गेलीय हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवंय. म्हणून आपण सरकार तयार करुया.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.