Devendra Fadnavis : आधी 5 वर्षे, नंतर 80 तास, आज फडणवीस तिसऱ्यांंदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, राज्यात पुन्हा मोठं सत्तांतर
हे सरकारही आता एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे कोसळलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता पुन्हा फडणवीस आणि शिंदे यांचं सरकार राज्याची धुरा सांभाळणार आहे.
मुंबई– देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Oath) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे काही वेळात राजभवनावर राज्यपालांची (Governor Bhagat Singh Koshyari) भेट घेत आहेत. सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर संध्याकाळीच या दोघांचा शपथविधी होणार असल्याची ताजी माहित समोर आली आहे. साधेपणाने हा शपथिविधी पार पडणार आहे, असेही सांगण्यात आले आहे. राजभवनात दरबार हॉलमध्ये या हायव्होल्टेज शपथविधीची तयारी करण्यात आली आहे. या शपथविधीसाठी दरबार हॉलमध्ये माध्यमांनाही बोलावण्यात आले आहे. राज्यात पुन्हा एकदा मोठं सत्तांतर होत आहे. आज पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या शपथविधीसाठी भाजपाचे मोठे नेतेही राजभवनाकडे निघाले आहेत. काही वेळापूर्वीच सागर बंगल्यावर एकनाथ शिंदे पोहचल्यानंतर याठिकाणी भाजपाचे मोठे नेते उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार असे बडे नेते याठिाकणी उपस्थित होते. गेल्या काही दिवासांपासून राज्यातलं राजकीय वातावरण हे तापलेलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत जात असल्याचे यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
पाच वर्षे आणि 80 तास आणि आता पुढे…
2014 ते 2019 या काळात भाजपच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांचा पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. त्यानंतर पुन्हा भल्या पाहटे अजित पवारांसोबत शपथ घेत ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र शरद पवारांच्या डावपेचापुढे हे सरकार 80 तासांपेक्षा जास्त काळ टीकू शकले नाही. शेवटी बहुमत नसल्याने फडणवीसांना नाईलाजस्त राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. मात्र हे सरकारही आता एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे कोसळलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता पुन्हा फडणवीस आणि शिंदे यांचं सरकार राज्याची धुरा सांभाळणार आहे.
नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत. नव्या मुख्यमंत्र्याला शुभेच्छा देण्याची आपल्यात पद्धत आहेत. आता ते पुन्हा येत आहे, असाही उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. सत्ताकारण थोडं बाजुला ठेवा आणि जनतेच्या हिताची कामं करा. भाजपने एक मोठा पक्ष फोडला आहे. इतर पक्षही सध्या चलबिचलमध्ये आहेत. आम्ही ते करू शकलो नाही. त्यामुळे आम्ही सत्ता गमावली आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच विधीमंडळातील बाबींवर इतर नेते बोलतील मी त्यावर बोलणार नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.