अजितदादांना सोबत घेतल्यावर काय झालं..कुणाला आवडलं, कुणाला…देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या अशा भावना

Devendra Fadnavis on Ajit Pawar : गेल्या वर्षी अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करुन महायुतीचा झेंडा हाती घेतला. लोकसभा निकालानंतर त्यावरुन फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले. संघाच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली. याविषयी फडणवीसांनी अशा भावना व्यक्त केल्या.

अजितदादांना सोबत घेतल्यावर काय झालं..कुणाला आवडलं, कुणाला...देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या अशा भावना
Devendra Fadnavis on Ajit Pawar
Follow us
| Updated on: Jul 21, 2024 | 3:50 PM

गेल्यावर्षी अजित पवार यांनी बंड केले. राष्ट्रवादीला खिंडार पाडले आणि महायुतीत सहभागी झाले. महाविकास आघाडीत आलबेल नसल्याच्या तिखट प्रतिक्रिया महायुतीतून आल्या. अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरुन शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीला खिंडार पाडल्याची चर्चा रंगली. पण लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मात्र वरिष्ठांसह संघाचा सूर आणि नूर बदलला. त्यांनी अजितदादांना सोबत घेतल्याने पराभवाचा सामना करावा लागल्याचा आरोप केला. त्यावर आता फडणवीसांनी मोठे भाष्य केले आहे.

जागा कमी आल्यावर कळतं की…

90 टक्के कार्यकर्त्यांना माहित आहे आपल्याला काही मिळणार नाही. पण तो विचारासाठी काम करतो. नवीन मित्र आल्याने काहींना आवडलं काहींना आवडलं नाही. पण आपण खुर्चीसाठी काही केलं नाही. राष्ट्रवादीला सोबत घेतल हे खरं आहे गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो. निवडणुकीत कमी जागा मिळाल्या वर कळत कि पक्षाचा कोण, खरा कोण, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

सरकार तर महायुतीचेच येणार

यावेळी विधानसभेत अडीच कोटी मत घेणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री कोण होणार हे आज विचारू नका, असे सुद्धा ते म्हणाले. तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री महायुतीचाच होणार. आज घोषणा करतो कि भाजप राज्यातील मोठा पक्ष असेल. महायुतीच सरकार नक्की येणार, असा मोठा दावा फडणवीस यांनी केला.

आमदारांचे देवेंद्र फडणवीस यांनी टोचले कान

आज राज्यात समाजामध्ये दुफळी तयार केली जात आहे. काहींना वाटते आम्ही असे केले तर निवडून येऊ याचमुळे पेट्रोल टाकले जात आहे. अरे निवडणुका येतील जातील पण दुफळी निर्माण करू नका. चार वेळा पवार मुख्यमंत्री होते मग आरक्षण का दिले नाही. शरद पवार चार वेळा म्हणाले की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. पण आता मतासाठी दुफळी निर्माण करण्याचे काम सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला.

सुप्रीम कोर्टात देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं तुम्ही का नाही टिकवले, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही अण्णा साहेब पाटील मंडळ तयार केले आणि तरुणांना उद्योग दिलेत. मनोज जरांगे याना माझा सवाल नाही माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना आहे. समाजासाठी कितीही शिव्या खाव्या लागल्या तरी चालतील पण तुमचा बुरखा फाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.