…तर मग ते ऑडिओ-व्हिडिओ सार्वजनिक करण्याशिवाय पर्याय नाही ; देवेंद्र फडणवीस यांचा अनिल देशमुख यांना इशारा

Devendra Fadnavis on Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. श्याम मानव यांनी पण हाच मुद्दा उचलून धरला. उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला.

...तर मग ते ऑडिओ-व्हिडिओ सार्वजनिक करण्याशिवाय पर्याय नाही ; देवेंद्र फडणवीस यांचा अनिल देशमुख यांना इशारा
अनिल देशमुख देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 9:53 AM

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडीविरोधात खोटे शपथपत्र दाखल करण्यासाठी दबाव आणल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे. ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा चुकवायचा असेल तर खोटे शपथपत्र दाखल करण्यासाठी फडणवीस यांच्या जवळील व्यक्तीने सांगितल्याचे देशमुखांचे म्हणणे आहे. याविषयी आपण फडणवीस यांच्याशी थेट संवाद साधल्याचे देशमुख म्हणाले. तर या प्रकरणात आता फडणवीस यांनी देशमुखांना इशारा दिला आहे.

काय आहेत आरोप

फडणवीस यांचा एक हितचिंतक आपल्याला अनेकदा भेटला. त्याने फडणवीस आणि आपल्यामध्ये फोनवरुन चर्चा घडवून आणली. फडणवीस यांनी आपल्याशी संपर्क साधला आणि काही कागदपत्रे पाठवत असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्याविरोधात आरोप करणे शक्य नसेल तर उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्याविरोधातील शपथपत्रावर स्वाक्षरी करण्याचा आग्रह धरला. आपण त्याला नकार दिल्याचे देशमुख म्हणाले. मुंबईचे माजी पोलीस संचालक परमबीर सिंह यांच्याशी संबंधीत हा वाद आहे. सिंह यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोपा लावला होता.

हे सुद्धा वाचा

श्याम मानव यांचा आरोप

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी काल आरोप केले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणात अडकविण्याच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुखांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

फडणवीस यांनी दिला असा इशारा

आपल्याविरोधात पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी जो आरोप लावला, त्यामागे फडणवीस यांचा कट असल्याचा आरोप देशमुख यांनी लावला. फडणवीस यांनी हा आरोप फेटाळला आहे. देशमुख यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांकडे ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत. जर माझ्याविरोधात असेच खोटे आरोप होत राहिले तर नाईलाजाने मला हे ऑडिओ आणि व्हिडिओ सार्वजनिक करावे लागतील, असा इशारा फडणवीस यांनी अनिल देशमुखांना दिला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.