Devendra Fadnavis : मी त्यावर बोलणार नाही म्हणता म्हणता फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाचं कारण सविस्तर सांगितलं

राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज आहे. सरकार पडले तर आम्ही पर्यायी सराकर देऊ. लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही, असे मी वारंवार सांगत होतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : मी त्यावर बोलणार नाही म्हणता म्हणता फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाचं कारण सविस्तर सांगितलं
फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा अजेंडा जाहीर केलाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 4:55 PM

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) शिवसेनेच्या आमदारांची कुचंबना झाली. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते सरकारमध्ये नवे मुख्यमंत्री असतील. त्यांचे स्वागत, असे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे कारण सांगितले तसेच ते पुढील मुख्यमंत्री असल्याची घोषणाही केली. ते म्हणाले, की शिवसेनेच्या या आमदारांची सरकारमध्ये कुचंबणा होत होती. आमच्या मतदारसंघात हरलेल्या विरोधकांना निधी दिला जात असेल तर कशाच्या भरवश्यावर लढायचे, असा विषय झाल्यानंतर या सर्वांनी निर्णय घेतला. की युती तोडायची, ज्या युती सोबत निवडून आलो. ती आघाडी तोडा. त्यासोबत राहायला तयार नाही, दुर्देवाने उद्धवजींनी या आमदारांच्या ऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (Congress NCP) नेत्यांना अधिक प्राधान्य दिले, अशी टीका त्यांनी केली.

‘मी मंत्रिमंडळात नसेल’

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचीच शेवटपर्यंत कास धरली. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी बोलणार नाही. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज आहे. सरकार पडले तर आम्ही पर्यायी सराकर देऊ. लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही, असे मी वारंवार सांगत होतो, असे फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले. त्यामुळे या आमदारांनी आपला आवाज बुलंद केला. मी त्याला बंड म्हणणार नाही. हे अंतर्विरोधाने भरलेले सरकार आहे. असे सरकार दीर्घकाळ चालणार नाही हे मी सांगत होतो, असा हल्लाबोल फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

हे सुद्धा वाचा

‘ही हिंदुत्वाची लढाई’

शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजपा आणि 16 अपक्ष आमदार एकत्र आले आहेत. अजून काही लोक येत आहेत. या सर्वांचे पत्र आम्ही राज्यपालांना दिले आहे. आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही. मुखमंत्रीपदासाठी आम्ही चालत नाही. ही तत्वाची लढाई आहे. हिंदुत्वाची लढाई आहे. विचाराची लढाई आहे. शिंदेंना भाजपा पाठिंबा देईल आणि शिंदे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज साडे सात वाजता शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.