नागपूरमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या, फडणवीस म्हणतात, पंचायत समितीत वाढल्या, वाचा आणखी काय म्हणाले?
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप नंबर वनचा पक्ष ठरला असला तरी नागपुरात मात्र भाजपच्या जागा प्रचंड घटल्या आहेत. (devendra fadnavis reaction on nagpur zilla parishad election result)
मुंबई: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप नंबर वनचा पक्ष ठरला असला तरी नागपुरात मात्र भाजपच्या जागा प्रचंड घटल्या आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सारवा सारव केली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत आमच्या जागा निश्चित कमी झाल्या आहेत. पण पंचायत समितीत वाढल्या आहेत. त्यामुळे आम्हीच नंबर वन आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधतानाच जिल्हा परिषद निवडणुका आणि नागपूरच्या निवडणूक निकालाचं विश्लेषण केलं. नागपूर जिल्हा परिषदेत आमची एक जागा गेली. पण पंचायतीत आम्ही चार जागा जिंकल्या याचा अर्थ जनतेने भाजपलाच जागा दिल्या आहेत. म्हणजेच नागपूरमध्येही भाजपच नंबर वन आहे, असं सांगतानाच भाजपची स्पेस वाढतेय, तीन पक्षाची स्पेस कमी होत असून शिवसेना अधिकाधिक खाली जात आहे. भाजपची स्पेस वाढत आहे. आम्ही स्पेस वाढवतच जाणार आहोत. शिवसेनेच्या जीवावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेची स्पेस खाणार आहे. त्यामुळे कोण रसातळाला चाललंय हे निवडणुकीतून स्पष्ट झालं. त्याचा विचार त्यांनी करावा, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
आम्हीच सरस
आम्ही कोणीही प्रचाराला गेलो नाही. मी, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवारीह प्रचाराला गेलो नाही. तरीही आम्हालाच जनतेने निवडून दिले. 25 ट्केक जागा भाजपला मिळाल्या. 25 टक्के जागा अपक्षांना मिळाल्या आणि उरलेल्या 50 टक्के जागा आघाडीच्या तीन पक्षांना मिळाल्या आहेत. म्हणजे त्यातही आम्हीच सरस आहोत. या निकालाने भाजप नंबर 1 पक्ष तर शिवसेना चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. सत्ता असूनही ते चौथ्या नंबरवर गेले आहेत, असं ते म्हणाले.
तर दसऱ्याआधी आंदोलन
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला इशारा दिला. अतिवृष्टीग्रस्तांना दसऱ्यापूर्वी मदत मिळाली नाही तर आम्ही आंदोलन करू. तीन पक्षाला सांगतो, लखीमपूर खीरीबाबत काय झाले हे ते सरकार पाहील. पण इथे लक्ष द्या. इथे रोज शेतकरी मरत आहेत. लखीमपूरवर बोलणारे पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात जात नाहीत अशी अवस्था आहे, असं ते म्हणाले.
नागपुरात काँग्रेसची सत्ता कायम
दरम्यान, नागपूरच्या 16 जागांपैकी भाजपने 3, राष्ट्रवादीने 2, काँग्रेसने 9 आणि इतरांचा एका जागेवर विजय झाला आहे. नागपूरमध्ये शिवसेनेला खातंही खोलता आलं नाही. नागपूर जिल्हाा परिषदेत काँग्रेसच्या दोन जागा वाढल्या आहेत. तर राष्ट्रवादीला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. तर भाजलाही एक जागा गमवावी लागली आहे. शेकाप आि इतर पक्षांना प्रत्येकी एक जागा जिंकता आली आहे. नागपूरमध्ये काँग्रेसची सत्ता कायम राहणार असून मंत्री सुनी केदार यांचं वर्चस्व कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे.
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 6 October 2021https://t.co/NusrP8DDaC#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2021
संबंधित बातम्या:
शिवसेनेला सर्वात मोठा धक्का, खासदारपुत्राचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत पराभव
(devendra fadnavis reaction on nagpur zilla parishad election result)