Devendra Fadnavis : राज्यात महायुती धोक्यात?; डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र अस्त्र राज्यात; राजीनामा नाकारला, पण…

Maharashtra State BJP : देवेंद्र फडणवीस यांचे मन वळविण्यात अखेर पक्षश्रेष्ठींना मोठे यश आले. लोकसभा निवडणुकीत राज्यातील अपयशी खेळीने फडणवीस राजीनाम्यावर ठाम होते. त्यांचा राजीनामा नाकारण्यात आला पण महायुतीसाठी एक धोक्याची घंटा आहे..

Devendra Fadnavis : राज्यात महायुती धोक्यात?; डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र अस्त्र राज्यात; राजीनामा नाकारला, पण...
डॅमेज कंट्रोल पक्षाचे, महायुतीचे कायम होणार?
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 9:39 AM

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेल्या हाराकिरीने महायुतीला धक्का बसला. घटक पक्षात ही कुरबुरी सुरु झालेल्या आहेत. तर या अपयशी खेळीमुळे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा पुढे केला. ते राजीनामा देण्यावर ठाम होते. पण दिल्लीत झालेल्या बैठकीत अखेर त्यांचे मन वळविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. त्यांचा राजीनामा नाकारण्यात आला असला तरी, एक मोठी जबाबदारी फडणवीस यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे.

लोकसभा निकालाची समीक्षा

लोकसभा निकालात भाजपला त्यांचे लक्ष्य गाठता आले नाही. प्रत्येक पक्ष लोकसभा निकालानंतर कुठे कमी पडलो, कुणाची साथ मिळाली नाही. नाराजीची कारणं काय, सर्वांचा सांगोपांग विचार करत आहे. भाजपमध्ये पण या हाराकिरीचे मंथन होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या कोर कमिटीची बैठक झाली.

हे सुद्धा वाचा

भाजपला तर फायदाच नाही

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याशी युती करुन कोणताही लाभ झाला नाही, हा मुद्दा समोर आला. महायुती करुनही भाजपच्या पदरात काहीच पडले नाही. या दोन्ही पक्षांच्या मतदारांनी भाजपला नाकारल्याचा दावा करण्यात आला. उलट भाजपमुळे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना फायदा झाल्याचा बैठकीत सूर आळवण्यात आला.

राज्यात महायुती धोक्यात?

महाराष्ट्रात तीन वर्षांपासून सत्तेत असूनही भाजप आणि महायुतीला लोकसभेत कामगिरी बजावता आली नाही. महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतली. आता चार महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. राज्यातील सर्वात मोठा गड विदर्भातील हारकिरी पक्षाला झोंबली आहे. हा गड मजबूत करण्यात येणार आहे. तर इतर क्षेत्रातील हक्काचे मतदार संघ गेल्याने तिथे डॅमेज कंट्रोल करण्यात येणार आहे. यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महायुतीबाबत मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. महायुतीचा पुनर्विचार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता महायुतीतून कोणाला बाहेरचा रस्ता दाखविला जातो की जागा वाटाघाटीत भाजप मुस्काटदाबी करते हे लवकरच समोर येईल.

फडणवीस लागले कामाला

दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. दिल्लीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा न देता प्रशासनामध्ये राहूनच पक्ष संघटना मजबूत करावी अशा आशयाची चर्चा झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत परतताच आज नागपूर मधल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची आढावा बैठक बोलावली. देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकार मधून मोकळ करावं अशी भूमिका मांडली होती. मात्र भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी त्यांच्या भूमिकेला नकार दिला. तो निर्णय मान्य करत देवेंद्र फडणवीस पुन्हा कामाला लागले.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.