इंग्लंडमध्ये असलेली तलवार आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच, देवेंद्र फडणवीसांनी आपला ‘पण’ सांगितला…

इंग्लंडमधील तलवार आपल्यासाठी महत्वाची आहे त्याचप्रमाणे आमच्या उदयनराजे भोसले यांच्याकडे असलेली तलवारही आमच्यासाठी महत्वाची आहे.

इंग्लंडमध्ये असलेली तलवार आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच, देवेंद्र फडणवीसांनी आपला 'पण' सांगितला...
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 9:15 PM

मुंबईः सध्याच्या काळातील राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारही वेगवेगळ्या निर्णय घेत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींनाही वेगळे वलय प्राप्त करुन देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने नुकतेच प्रतापगडावरील अफजल खान कबरीलजवळील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे सर्वस्तरातून कौतूकही होऊ लागले.

एकीकडे या घटना चालू असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, इंग्लंडमध्ये असलेली छत्रपती तलवार आणण्यासाठी आपण प्रयत्न करणारच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

या तलवारीविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार हे सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हे प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्या प्रमाणे इंग्लंडमधील तलवार आपल्यासाठी महत्वाची आहे त्याचप्रमाणे आमच्या उदयनराजे भोसले यांच्याकडे असलेली तलवारही आमच्यासाठी महत्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

तलावारीबद्दल बोलताना त्यांनी हेही सांगितले की, ज्यांनी कुणी हे घेऊन गेले आहेत, ते आपण पाहिलं पाहिजे. आणि जे-जे आपल्याकडून घेऊन गेले आहेत ते आपण आणलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आरोप केले होते, त्ंयाविषयी बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आरोप करण्याची सवय असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे त्यांनी टीका करण्याऐवजी मला असं वाटतं की कधीतरी त्यांनी आपल्या अंतर्मनात शिरून पाहिले पाहिजे म्हणजे त्यांना त्याचे उत्तर मिळेल असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी आपल्या तुरुंगवासाची तुलना लोकमान्य टिळक आणि सावरकर यांच्याशी केलेली आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, यावर मी फक्त स्मितहास्य देईन.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना ते म्हणाले की, आम्ही पहिल्यापासून असंच म्हणतो आहे की, महाराष्ट्रात कोणतीही यात्रा आली तरी तिला संरक्षण देण्याची जबाबदारी ही आमची आहे.

त्यामुळे त्याविषयी आताच जास्त काही न बोलता प्रतिसादाबद्दल यात्रा संपल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी भारत जोडो यात्रेबद्दल सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.