देवेंद्र फडणवीस म्हणतात, हा नॅनो मोर्चा, अमोल मिटकरी यांनी दिला इतिहासाचा दाखला

मी इतिहासाचा दाखला देत आहे. सध्याचं महाराष्ट्राचं आणि केंद्राचं राज्य औरंगजेबासारखेचं आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, हा नॅनो मोर्चा, अमोल मिटकरी यांनी दिला इतिहासाचा दाखला
अमोल मिटकरी
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 7:41 PM

मुंबई : येथील महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मिटकरी म्हणाले, आधीचं सांगितलं होतं की, लाखाची गर्दी होणार. जी अपेक्षा होती त्यापलीकडं लोकं आलीत. फुले, शाहू, आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना हा सणसणीत इशारा आहे. एवढा मोठा मोर्चा काढून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी होत नसेल, तर केंद्र सरकार निगरगट्ट आहे. मोर्चाची गर्दी पाहून भाजपच्या पायाखालची जमीन सरकली.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, हा नॅनो मोर्चा होता. या मोर्चाने काही फरक पडणार नाही. त्यावर अमोल मिटकरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे फार कमी होते. औरंगजेबालाही असंच वाटत होतं की, हे मावळे काय करतील. हे शिवरायांचे मुठभर मावळे आहेत. हे बाबासाहेबांचे मुठभर अनुयायी आहेत.

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली आहे. त्यामुळं त्यांना लवकरचं फरक दिसेल. इथं आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये क्रांतीची आग आली आहे. १९६० नंतर इतका मोठा मोर्चा महाराष्ट्रानं पाहिला. देवेंद्र फडणवीस यांना फरक पडो की, न पडो मात्र नरेंद्र मोदी यांना नक्कीच फरक पडणार, असा इशाराचं अमोल मिटकरी यांनी दिला.

मी इतिहासाचा दाखला देत आहे. सध्याचं महाराष्ट्राचं आणि केंद्राचं राज्य औरंगजेबासारखेचं आहेत. जे शिवाजी महाराजांचा अवमान करतात, ते औरंगजेबाचेच समर्थक ना. संभाजी महाराज पकडले गेले. आता काय करतील कोणी, असं औरंगजेबाला वाटत होतं. संताजी आणि धनाजी यांनी तंबूचे कळस कापले होते. हे संताजी आणि धनाजी यांचे मावळे आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

सरकार पडणार हे देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत आहे. त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या आधी केला नाही. ज्या दिवशी विस्तार होईल, त्या दिवशी हे सरकार कोसळलेलं असेल. देवेंद्र फडणवीस हे चाणाक्ष्य असलेले भाजपतील एक नेते आहेत. त्यामुळं सरकार कोसळण्यासाठी फेब्रुवारीची वाट कशाला, असंही अमोल मिटकरी म्हणाले.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.