मोठ्या अभिनेत्यांबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी, देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला

वेळ पडली तर रस्त्यावर उतरू. आता शिक्षकांचा अंत बघू नका, असं फडणवीस म्हणाले आहेत. (Devendra Fadnavis Teacher Protest Nana Patole )

मोठ्या अभिनेत्यांबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी, देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 3:12 PM

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदानातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. विनाअनुदानित शिक्षकांसंदर्भातील आमच्या सरकारचा निर्णय ठाकरे सरकारनं थांबवल्यानं शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंना लगावला आहे.  (Devendra Fadnavis slams Maha Vikas Aghadi Government over teacher protest and Nana Patole )

नाना पटोलेंचे वक्तव्य प्रसिद्धीसाठी

नाना पटोलेंचं अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या संदर्भातली विधान म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते. म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ, असा टोला, देवेंद्र फडणवीस यांचा नाना पटोलेंना लगावला.

20 टक्के अनुदान 40 टक्के करणार होतो

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना 20 टक्क्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यामध्ये वाढ करून पुढे तो 40 टक्के करणार होतो. हा निर्णय जवळपास 60 टक्के झाला होता. पुढे काय झाल हे वेगळ सांगायची गरज नाही. सत्ता बदलली तस गोष्टी बदलल्या. आम्ही घेतलेला निर्णय सत्ता असती तर पुढे राबवता आला असता. इथ हजारो आंदोलन पाहिली आहेत पण आजवर इथे अस होत नव्हतं. आम्ही आंदोलनाची दखल घेत होतो. आंदोलनाकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही. भाजपचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकार  कोडगं

विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न आम्ही आजच्या बैठकीत मांडणार आहोत. जर अस झालम नाही अधिवेशन चालू देणार नाही. एकीकडे मुंबईच्या बिल्डरांना 5 हजार कोटींची सुट तर दुसरीकडे तिनशे ते चारशे कोटी रूपये नाहीत. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू. आता शिक्षकांचा अंत बघू नका, असं फडणवीस म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या:

चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी: देवेंद्र फडणवीस

ही तर रोजचीच बोंबा बोंब, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर पुन्हा हल्ला

(Devendra Fadnavis slams Maha Vikas Aghadi Government over Teacher Protest )

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.