Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरुन पोलीस बाहेर पडले, तब्बल 2 तास जबाब नोंदवला

देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांचं पथक दाखल झालं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर पोलिसांनी जबाब नोंदवला.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरुन पोलीस बाहेर पडले, तब्बल 2 तास जबाब नोंदवला
देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवून पोलीस बाहेर पडलेImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 2:36 PM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची दोन तासांपासून सुरु असलेली चौकशी संपली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांचं (Mumbai Cyber Police) पथक दाखल झालं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर पोलिसांनी जबाब नोंदवला. डीसीपी हेमराजसिंह राजपूत आणि एसीपी नितीन जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात आला. मुंबई सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. पोलीस दुपारी 12 वाजता दाखल झाले. यानंतर तब्बल दोन तासानंतर हे पथक बंगल्याबाहेर पडलं आहे. यावेळी भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरा बाहेर गर्दी केली होती.

दोन तास  जबाब नोंदवल्यानंतर पोलीस बाहेर पडले

देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यापूर्वी 6 वेळा चौकशीसाठी नोटीस दिली होती. देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई सायबर पोलीस दुपारी 12 वाजता दाखल झाले होते. 12 ते 2  या काळात देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात आला. यानंतर मुंबई पोलीस देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान सागर येथून बाहेर पडले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी नोटीस दिलेली : दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील यांनी तुम्ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे, असं म्हटलंय. हा गुन्हा सायबर पोलीस ठाणे मुंबई येथे 26 मार्च 2021 रोजी दाखल झाला होता. अज्ञात इसमानं राज्य गुप्तवार्ता विभागाची माहिती गोपनीय माहिती प्राप्त केली होती. राज्य गुप्तवार्ता विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेल्यानं हा गुन्हा नोदं करण्यात आला होता. भारतीय टेलिग्राफ कायदा,  गोपनियता कायदा याअतंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.  त्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झाला होता, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. आतापर्यंत 24 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.  यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा नोटीस बजावण्यात आलं होतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नोटीस म्हणजे समन्स नव्हे, असं देखील वळसे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी कोणती माहिती द्यायची कोणती नाही हा त्यांचा अधिकार आहे. यापूर्वी  फडणवीस यांना नोटीस पाठवली होती त्यावेळी त्यांना प्रश्नावली पाठवली होती. प्रश्नावलीची उत्तर त्यांनी दिली नव्हती. त्यामुळं आज पोलीस त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवून घेत आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

इतर बातम्या:

VIDEO: फडणवीसांना एक नव्हे सहावेळा नोटीसा, जबाब नोंदवणं यात काही गैर नाही: दिलीप वळसेपाटील

तर ठाकरे सरकारने दाऊदला महाराष्ट्र भूषण द्यावा- नितेश राणे

Devendra Fadnavis statement Mumbai Cyber Police recorded LOP statement in Confidential information leak case

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.