‘फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबलं; सचिन वाझे पदावर राहिले तर अनेकांना बेड्या पडतील’

देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांना निलंबित करुन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली. | Devendra Fadnavis Anvay naik

'फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबलं; सचिन वाझे पदावर राहिले तर अनेकांना बेड्या पडतील'
आमदार भास्कर जाधव
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 3:18 PM

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी 2017 साली मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक (Anvay Naik case) प्रकरण दाबले. आता त्यांच्या पत्नीच्या विनंतीवरून ठाकरे सरकार याप्रकरणाची चौकशी करत आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) याप्रकरणाचा तपास करत होते. ते पदावर कायम राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह (Devendra Fadnavis) अनेकजण अडचणीत येतील. त्यामुळे भाजपकडून सचिन वाझे यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला. (Shivsena leader Bhaskar Jadhav slams Devendra Fadnavis)

ते मंगळवारी विधानसभेत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांना निलंबित करुन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली. त्यानंतर विरोधी आमदारांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन सभागृह दणाणून सोडले. तेव्हा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी अन्वय नाईक प्रकरणाचा दाखला देत भाजपवर प्रतिहल्ला केला.

देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबलं. ठाकरे सरकारने याप्रकरणाची चौकशी सुरु केल्यानंतर सचिन वाझे यांच्याकडे तपास देण्यात आला होता. त्यांनी अर्णव गोस्वामीला घरातून उचलून आणले. त्यामुळे आता सचिन वाझे पदावर कायम राहिले तर यांना बेड्या पडतील, या भीतीने विरोधक सचिन वाझे यांना लक्ष्य करत आहेत, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.

भास्कर जाधव मला धमक्या द्यायच्या नाहीत: देवेंद्र फडणवीस

अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. ही गोष्ट भास्कर जाधव यांना माहिती नसेल. तुम्ही मला धमक्या देऊ नका. मी धमक्यांना घाबरत नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.

होय मी CDR मिळवला, माझी चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचं ओपन चॅलेंज

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मनसुख (Mansukh Hiren) मृत्यूप्रकरणात केलेल्या आरोपांमुळे सत्ताधारी महाविकासआघाडीची कोंडी झाली आहे.उपलब्ध पुरावे हे सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना बडतर्फ करून त्यांचा तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

त्यांच्या या मागणीनंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. तेव्हा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला. मुळात देवेंद्र फडणवीस यांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) कसे मिळाले, त्यांना ते मिळवण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.

नाना पटोले यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस ताडकन उभे राहिले आणि सरकारने माझी चौकशी करावीच, असे खुले आव्हान दिले. मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा. पण खून केला त्याला पाठिशी का घालता? तुम्ही मला चौकशी लावण्याची धमकी देत आहात का? सभागृहात बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही माझी चौकशी लावा. मात्र, याप्रकरणात तुम्ही शोधणार नाही, त्यापलीकडची माहिती मी मिळवून दाखवतो, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला ललकारले.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या

‘त्यांना वाटलं खाडीला भरती आहे मनुसख हिरेनची बॉडी कधी सापडणारच नाही, पण…’

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास ‘एनआयए’ करणार; हिरेनप्रकरण एटीएसकडेच

(Shivsena leader Bhaskar Jadhav slams Devendra Fadnavis)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.