‘त्या’ दोन गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या हाती लागल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात खळबळ

देवेंद्र फडणवीस यांच्या सनसनाटी आरोपांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी गटाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. | Devendra Fadnavis Mansukh hiren death

'त्या' दोन गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या हाती लागल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात खळबळ
देवेंद्र फडणवीस यांच्या या चोख प्रत्युत्तरामुळे सत्ताधारी आमदारांना शांत बसावे लागले. अखेर आमदारांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 1:10 PM

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी सभागृहात मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरुन काही गौप्यस्फोट करत सत्ताधाऱ्यांना चांगलाच धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन (Mansukh hiren ) याची पत्नी विमला हिरेन हिच्या तक्रारीची प्रत सभागृहात वाचून दाखविली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगली कोंडी झाली. विरोधकांचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा बाहेर काढला. मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक भाजप नेत्यांची नावे असल्याचा दावा अनिल परब यांनी केला. (Devendra Fadnavis slams Mahaviaks Aghadi govt over Mansukh hiren death)

तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न लावता आमच्याकडे मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटची प्रत असल्याचे सांगितले. या सुसाईड नोटमध्ये एकाही भाजप नेत्याचे नाव नाही. मोहन डेलकर यांनी प्रशासक असा उल्लेख केला आहे. त्यांनी कुठेही भाजप नेत्यांची नावे लिहलेली नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या या चोख प्रत्युत्तरामुळे सत्ताधारी आमदारांना शांत बसावे लागले. अखेर आमदारांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली बैठक

विमला मनसुख यांच्या तक्रारीची प्रत आणि डेलकर यांची सुसाईड नोट देवेंद्र फडणवीस यांच्या हाती पडलीच कशी, असा प्रश्न आता सत्ताधाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सनसनाटी आरोपांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी गटाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला अनिल परब, एकनाथ शिंदे, अजित पवार, अनिल देशमुख हे नेते हजर असल्याचे समजते. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठकही बोलावण्यात आली होती. या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख हिरेन मनसुख प्रकरणात सभागृहात निवेदन देतील, असे ठरले.

फडणवीस काय म्हणाले?

मी जबाब वाचून दाखवतो. वरील एकंदर परिस्थितीवरुन, माझ्या पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केला असावा असा माझा संशय आहे. म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी व्हावी. यामध्ये अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे २०१७ चा एफआयआर आहे. यानुसार दोन लोकांनी ४० लाखांची खंडणी मागितल्याचा एफआयआर आहे. यामध्ये दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. यातील एकाचं नाव आहे धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसरा सचिन हिंदुराव वझे.

हा जो मनसुख हिरेन आहे. यांचं शेवटचं लोकेशन आहे ते धनंजय विठ्ठल गावडे यांच्याठिकाणी आहे. 40 किमीवर बॉडी सापडते. गावडेच्या ठिकाणी जाण्याचे कारण काय? काहीच नाही. गावडेच्या ठिकाणापासून ४० किमीवर हिरेन यांची बॉडी सापडली. त्यामुळे हे स्पष्ट आहे, यापेक्षा अधिक पुरावे काय हवेत?

अध्यक्ष महोदय, 201 खाली सचिन वाझेंना अटक का झाली नाही? ३०२ चं सोडून द्या. मला राजकारण नको. ते कोणत्या पक्षाचे आहेत याच्याशी देणंघेणं नाही. कोण वाचवतंय, आणि कशासाठी वाचवतंय. आम्हाला संशय आहे, मनसुख हिरेन यांची हत्या गाडीमध्ये करण्यात आली. गावडेंच्या एरियात करण्यात आली. आणि त्यानंतर त्यांची बॉडी खाडीत फेकण्यात आली. यांची चूक कुठे झाली, यांना वाटलं हाय टाईड आहे. बॉडी परत आली नसते, लो टाईड होती, म्हणून परत आली. 302 च होत राहिल. तात्काळ सचिन वाझेंना अटक झाली पाहिजे.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या

‘त्यांना वाटलं खाडीला भरती आहे मनुसख हिरेनची बॉडी कधी सापडणारच नाही, पण…’

(Devendra Fadnavis slams Mahaviaks Aghadi govt over Mansukh hiren death)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.