जालन्यातील लाठीचार्ज, मनोज जरांगेंशी चर्चेची तयारी ते आरक्षण कसं मिळणार?; देवेंद्र फडणवीसांची महास्फोटक मुलाखत
Devendra Fadnavis TV9 Marathi Interview : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. अशात सरकार यावर तोडगा कसा काढणार आहे? मनोज जरांगे यांच्याशी चर्चेसाठी सरकार तयार आहे का? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत, टीव्ही 9 मराठीवर... पाहा...
मुंबई | 29 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षण हा सध्या राज्यातील हॉट टॉपिक आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणारच नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. मनोज जरांगे पाटील सध्या उपोषण करत आहेत. त्यामुळे आरक्षण प्रश्नी राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या सगळ्या प्रश्नांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत सविस्तर उत्तरं दिली. मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे यांना त्यांनी साद घातली. तसंच हा प्रश्न कसा सोडवणार यावरही भाष्य केलं.
मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीतार्ज झाला. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. या लाठीचार्जबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली. मात्र हा लाठीचार्ज झाला कसा? यावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केलं. मला जालन्यातील लाठीमारची माहिती नव्हती. मी एका कार्यक्रमात होतो. माझा संबंध नसताना मी माफी मागितली होती. पण आता जे काही सुरू आहे. त्यावरून मुख्यमंत्री काम करत आहे. त्यांना संधी दिली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
टीव्ही 9 मराठीवरील मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं. सरकार जेवढ्या वेगाने सोडवणूक करता येईल तेवढा प्रयत्न करू. गिरीश महाजन यांनी त्याच दिवशी संवाद साधला. आमचा प्रयत्न सुरू आहे. मीडियाच्या माईकसमोर संवाद होऊ शकत नाही. संवाद करायचं तर दहा माणसं बसवा. शंभर माणसं बसवा. माईक समोर संवाद होत नाही. चार गोष्टी तुम्ही सांगा, आम्हीही चार गोष्टी सांगू. आमचं त्यांना चर्चेचं नेहमीच आवाहन आहे. मुख्यमंत्रीच स्वत चर्चा करत आहेत. आमचा प्रयत्न आहे आंदोलन लवकर लॉजिकल एंडला नेता यावं. प्रश्न सुटावा. कायद्याने काय प्रश्न असेल तर मार्गी लावू. शिंदे समिती काम करत आहे. वाऱ्यावर कुणालाच सोडलं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
आंदोलकांनी हिंसा करू नये. लोकशाहीत गावबंदी करणं योग्य नाही. त्यांनी केलीय आपण प्रत्येकाला समजावू शकत नाही. आमचा प्रयत्न शांतता राहावी. हिंसा होऊ नये. प्रश्न सोडवण्याचं काम आम्हीच करत आहोत. त्यांचा प्रश्न सोडवणं हेच आमचं काम आहे. तेच आम्ही करत आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.