Axis bank: ए भाई जगताप, मला डिवचू नको, माझ्यावर बोट उचलायचं न्हाय; अमृता फडणवीसांचा पलटवार
त्यांच्या आताच्या ट्विटमधील भाषा नेहमीपेक्षा खूपच आक्रमक आहे. | Amruta Fadnavis Bhai Jagtap
मुंबई: पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती अॅक्सिस बँकेत (Axis bank) वळवल्यावरुन देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणारे काँग्रेस नेते भाई जगताप (Bahi Jagtap) यांना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आक्रमक आणि एकेरी भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बँके ‘ ला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. (Amruta Fadnavis slams congress leader Bhai Jagtap)
अमृता फडणवीस या एरवी महाविकासआघाडीतील पक्षांवर सातत्याने टीका करत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट टीका करायला त्या मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, त्यांच्या आताच्या ट्विटमधील भाषा नेहमीपेक्षा खूपच आक्रमक आहे. त्यामुळे आता भाई जगताप या ट्विटला काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
भाई जगताप काय म्हणाले होते?
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं, असे भाई जगताप यांनी म्हटले होते. ही टीका अमृता फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र राज्य पोलिस विभागात दोन लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे वार्षिक पगार 11 हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून अॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती. माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस ‘अॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे याचा संबंध जोडला जात होता.
देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण काय?
अॅक्सिस बँक किंवा सरकारी खात्यांशी संबंधित कोणत्याही बँकांची निवड मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केली होती. जर सरकारमधील एखाद्याला असं वाटतं, की माझी पत्नी त्या बँकेत काम करते, म्हणून ते माझ्या सरकारची बदनामी करु शकतात, तर तसं होणार नाही. माझी पत्नी कधीच सरकारी कार्यालयात आली नाही किंवा पाच वर्षांत एखाद्या सरकारी अधिकाऱ्याशी तिने भेट घेतलेली नाही, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं होतं.
संबंधित बातम्या:
तुम्हाला अॅक्सिस बँकेने प्रमोशन का दिले, किती फायदा करुन दिलात; अमृता फडणवीस म्हणाल्या…
“दलबदलूंना प्रामाणिकपणा काय समजणार?” अमृता फडणवीस-प्रियांका चतुर्वेदींचे ट्विटयुद्ध
रोहित पवार म्हणाले, तुम्ही संधीचा योग्य फायदा उठवलात, आता अमृता फडणवीस म्हणतात..
(Amruta Fadnavis slams congress leader Bhai Jagtap)