Devendra Fadnavis : दोन वर्षात दोन मोठे पक्ष फोडल्यावर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात लागणार लॉटरी?

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री मात्र फडणवीसही उपमुख्यमंत्री असल्याने राज्याचे आता दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असून त्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.

Devendra Fadnavis : दोन वर्षात दोन मोठे पक्ष फोडल्यावर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात लागणार लॉटरी?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 11:17 PM

मुंबई : कर्नाटकात फटका बसल्याने भाजप आतापासूनच राज्यात तयारीला लागल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपला फटका बसण्याची शक्यत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या शिंदे-बैठकीनंतर राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीसारखा पक्षामध्ये उभी फूट पडल्याने आता राज्यातील राजकारणात नवं समीरकरण दिसणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री मात्र फडणवीसही उपमुख्यमंत्री असल्याने राज्याचे आता दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असून त्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरुन वाद झाला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली, पण अवघ्या 72 तासातच हे सरकार कोसळलेलं. यानंतर काही महिन्यातच महाविकास आघाडी स्थापन झाली, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी सरकार बनवलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. भाजपला सर्वात जास्त जागा मिळूनही सत्ता स्थापन करता आली नाही, याची खंत अनेक वेळा भाजपच्या मोठ्या नेत्यांनी बोलून दाखवली होती. काही काळानंतर शिंदेनी बंड करून शिवसेना फोडली आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं.

शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस जाणार नव्हते

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप-शिवसेना सरकारमध्ये फडणवीसांनी सामील होणार नसल्याचे जाहीर केलं होतं. बाहेरून सरकारला माझा पूर्ण पांठिबा असल्याचे फडणवीस म्हणाले होते. पण, काहीवेळानंतरच थेट भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माध्यमांसमोर येत फडणवीस सरकारमध्ये थेट सामील होणार असल्याचे जाहीर केलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानाव लागलं होतं.

देवेंद्र फडणवीस होणार केंद्रात मंत्री?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने, सरकारमध्ये अनेक बडे नेते असणार आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता सरकारमध्ये दोन-दोन उपमुख्यमंत्री झाल्याने देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.