राज ठाकरे महायुतीत येण्याचा निर्णय कधी? देवेंद्र फडणवीस म्हणाले, फक्त…

अखेर राज ठाकरे महायुतीत कधी येणार ? ते किती आणि कोणत्या जागा लढवणार ? अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीचं नेमकं फलित काय ? असे प्रश्न सर्वांनाच पडले आहेत. हाच प्रश्न आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विचारण्यात आला.

राज ठाकरे महायुतीत येण्याचा निर्णय कधी? देवेंद्र फडणवीस म्हणाले, फक्त...
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 2:10 PM

मुंबई | 20 मार्च 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात काल दिल्लीत भेट झाली. अर्धा तास झालेल्या बैठकीत त्या दोघांमध्ये युतीबाबत चर्चा झाली. राज ठाकरे -अमित शाह यांच्या या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचंही लक्ष लागलं होतं. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि भाजप नेते विनोद तावडे उपस्थित होते. मनसेला किती जागा सोडल्या जाणार ? महायुती कशी असेल ? महायुतीत मनसेचं स्थान काय असेल ? आणि राज्यात मनसेचं स्थान काय असेल ? मनसे राज्यातील सत्तेत असेल की नाही ? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले. मात्र अमित शाह यांची भेट घेऊन राज ठाकरे लागलीच मुंबईत परतले. पण तरीही काल ना मनसेकडून ना भाजपकडून युतीची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

अखेर राज ठाकरे महायुतीत कधी येणार ? ते किती आणि कोणत्या जागा लढवणार ? अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीचं नेमकं फलित काय ? असे प्रश्न सर्वांनाच पडले आहेत. हाच प्रश्न आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांची अमित शाह यांची भेट झाली आहे. मला असं वाटतं आत्ता या विषयावर काहीही प्री-मॅच्युअर बोलण्यापेक्षा एक-दोन दिवस वाट पाहा. लवकरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर काहीही स्पष्ट बोलणे टाळले.

मनसेला मुंबईतील जागा मिळणार ?

दरम्यान, राज ठाकरे यांची ताकद मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांना मुंबईतील जागा सोडल्या जाऊ शकतात असा कयास लढविला जात आहे. याशिवाय राज ठाकरे यांना पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबादमध्येही जागा मिळतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पहिल्यांदाच युती

दरम्यान, राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढली. त्यांनी कोणत्याही पक्षाशी युती केली नाही. महापालिकेपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत राज यांची भूमिका एकला चालो रे राहिली आहे. मात्र, आता राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांच्या अलायन्सच्या राजकारणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे राज या महायुतीत येतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.