Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच धनंजय मुंडेंचा कामाचा सपाटा, मंत्रालयात दाखल होत…

आता पूर्ण बरे झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर लगेच धनंजय मुंडे हे कामला लागल्याचे दिसून आले. त्यांनी थेट मंत्रालयात दाखल होत दैनंदिन कामांना सुरूवात केली.

Dhananjay Munde : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच धनंजय मुंडेंचा कामाचा सपाटा, मंत्रालयात दाखल होत...
धनंजय मुंडेंनी कामाला सुरूवात केलीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 4:11 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी आली आणि सर्वानाच धडकी भरली. सुरुवातील धनंजय मुंडेंना सौम्य हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र दुसऱ्या दिवशीच अजित पवारांनी (Ajit Pawar) या चर्चा धुडकावून लावल्या आणि धनंजय मुंडेंना भोवळ आल्याचे सांगितले. धनंजय मुंडेंना ज्या रात्री रुग्णालयात दाखल केलं त्याच रात्री राजेश टोपे यांनी रुग्णालयात दाखल होत मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडूनही त्यांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधत काळजी करण्यासारखं काही हे स्पष्ट केलं. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी पार्थनाही केल्या. आता पूर्ण बरे झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर लगेच धनंजय मुंडे हे कामला लागल्याचे दिसून आले. त्यांनी थेट मंत्रालयात दाखल होत दैनंदिन कामांना सुरूवात केली.

अनेकांकडून मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस

रोजच्या कामाचा ताण, होणारा जास्त प्रवास यामुळे धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडल्याचे यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच धनंजय मुंडे यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे रुग्णालयात दाखल होण्याच्या आधल्या रात्रीच परभणीवरून आल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर जनता दरबारही होता असेही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले. फक्त राजेश टोपेच नाही तर मुख्यमंत्र्यांपासून ते पंकजा मुंडे यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचेही दिसून येते.

कार्यकर्त्यांचीही चिंता मिटली

ठाकरे सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे सध्या सामाजिक न्याय विभागाचे कामकाज आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षातही त्यांचा मोठा दबदबा आहे. अजित पवारांच्या जवळचे नेते म्हणून धनंजय मुंडे ओळखले जातात. तसेच धडाडीने काम करताणारा नेते, अर्ध्या रात्रीही कार्यकर्त्यांचा आणि मतदारसंघातील फोन घेणारा नेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते. तरुणाईमध्येही मंत्री धनंजय मुंडे यांची मोठी क्रेझ आहे. त्यामुळेच मुंडे अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने कार्यकर्ते चिंतेत होते. आता त्यांची चिंता मिटली आहे. कारण त्यांचा नेता आज पुन्हा त्यांना त्याच जुन्या धडाडीने काम करताना दिसून आला आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या याच वेगळेपाणामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना परभूत करत परळी मतदारसंघातून मोठा विजय प्राप्त केला.

Girish Mahajan : ‘लायकी नसताना पक्षानं एकनाथ खडसेंना पद दिलं’, गिरीश महाजनांचा घणाघात; मानसिक संतुलन बिघडल्याचाही टोला

Raj Thackeray : राज ठाकरेंना केंद्राची सुरक्षा? हालचाली सुरू; राज यांचे महत्त्व वाढवण्याचे प्रयत्न?

Pune Girish Mahajan : भाजपाकाळात एक दिवसही भारनियमन करावं लागलं नाही, वीजप्रश्नी गिरीष महाजनांची पुण्यात महाविकास आघाडीवर टीका

उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ.
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड.
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?.
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं.
VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी
VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी.
'बांगर बोलतोय', डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख...डॉक्टरलाच धरलं धारेवर
'बांगर बोलतोय', डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख...डॉक्टरलाच धरलं धारेवर.
भारतात लांब कानाचे कुत्रे कुठे? वाघ्याला फेकून द्या, राजेंचा संताप अन्
भारतात लांब कानाचे कुत्रे कुठे? वाघ्याला फेकून द्या, राजेंचा संताप अन्.