Dhananjay Munde Hospital Photo : धनंजय मुंडे यांचा रुग्णालयातला पहिला फोटो, मुख्यमंत्र्यांकडूनही तब्येतीची विचारपूस
सुरूवातील त्याना सोम्य हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र अजित पवारांनी हे खोडून काढत भोवळ आल्याचे सांगितले. आता रुग्णालयातील त्यांचा पहिला फोटो समोर आला आहे. त्यांच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना तब्येतीच्या कारणास्तव मंगळवारी रात्री मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांची पॅकृती सध्या स्थिर आहे. मात्र धनंजय मुंडे यांना रात्री अचानक त्रास जणवू लागला होता. सुरूवातील त्याना सोम्य हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र अजित पवारांनी हे खोडून काढत भोवळ आल्याचे सांगितले. आता रुग्णालयातील त्यांचा पहिला फोटो समोर आला आहे. एका इन्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटवर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यानंतर बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत आराम करण्याचा सल्ला दिला. अजित पवार यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही दूरध्वनी वरून धनंजय मुंडे यांची विचारपूस करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री महोदयांनी रुग्णाल्यामध्ये जाऊन मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
चाहत्यांची इन्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
सर्वपक्षीयांकडून तब्येतीची विचारपूस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही फोन करुन मुंडेंना काळजी घेण्याचा सल्ला दिला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही मुंडे यांची भेट घेऊन आराम करण्याचा सल्ला दिला.
दरम्यान धनंजय मुंडे यांना आज दिवसभरात खा. सुप्रियाताई सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, क्रीडा मंत्री संजय केदार, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रीतमताई मुंडे, आ. किरण सरनाईक, आ. आशिष शेलार, आ. बाळासाहेब आजबे, आ. विक्रम काळे, आ. संजय दौंड, आ. निरंजन डावखरे, सलील देशमुख, सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, श्री. बिपीन श्रीमाळी यांसह अनेकांनी भेटून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राजेश टोपे यांनी दिली तब्येतीची माहिती
धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात मंगळवारी रात्रीपासून उपचार सुरु आहेत. सततच्या प्रवास व दगदगीमुळे मुंडेंची प्रकृती बिघडली, त्यांच्या प्रकृतीबाबत काळजीचे कारण नाही, मात्र डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.