Dhananjay Munde Case | धनंजय मुंडेंचा छळ झाला, ते त्रासात होते : जयंत पाटील
Dhananjay Munde Renu Sharma Case : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा न घेण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्यानंतर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. (Dhananjay Munde Jayant Patil)
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्यानंतर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jyanat Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. धनंजय मुंडे हे मागील काही वर्षांपासून त्रासात होते. त्यांचा छळ झाला आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. “धनंजय मुंडे यांच्याकडे जो फोन आहे, त्या फोनवर मुंडे यांना तक्रारदार महिलेने अनेक धमक्या दिलेल्या आहेत. धनंजय मुंडे मागील काही वर्षांपासून कोणत्या त्रासात होते? तसेच त्यांचा कशा पद्धतीने छळवाद करण्याचं काम झालं याची माहिती पोलिसांनी घेणं आवश्यक आहे, असं जयंत पाटील म्हणाले. (Dhananjay Munde was tortured he was in trouble said Jayant Patil)
धनंजय मुंडेंना फोनवरुन धमक्या
धनंजय मुंडे यांना अनेक दिवसांपासून फोनवरुन धमक्या येत असल्याचाही गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केला आहे. “ज्या महिलने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्या महिलेवर इतर दोन नेत्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. त्यावरुन या महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असल्याचे प्रतिबिंबित होत आहे. भाजपच्या एका माजी आमदाराने त्याविषयी स्पष्टपणे सांगितले आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे जो फोन आहे, त्या फोनवर मुंडे यांना तक्रारदार महिलेने अनेक धमक्या दिलेल्या आहेत,” असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, मुंडे यांचा कशा पद्धतीने छळवाद करण्याचं काम झालं याची चौकशी पोलिसांनी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप खरे ठरले तर आम्हाला काही तक्रार नसल्याचंही त्यांनी म्हणत इतरांच्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्याच गोष्टी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत घडल्या असतील तर याबाबत सखोल चौकशी व्हायला हवी असं विधान पाटील यांनी केलंय.
आरोपांना ग्रहीत धरण्याची पद्धत चुकीची
यावेळी बोलताना कोणीही आरोप केले की त्या आरोपांना ग्रहीत धरणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. “कार्यकर्ता घडण्यासाठी अनेक वर्ष लागतात. कोणीतरी आरोप केले की ते ग्रहीत धरायचे. त्या माणसाच्या राजकारणाच शेवट करायचा, ही पद्धत चुकीची आहे. माणसाने 30 ते 40 वर्षे राजकारणात घातलेले असतात त्यामुळे या प्रकरणामध्ये जे आरोप झालेले आहेत. त्या आरोपाची चौकशी व्हायला हवी,” असे जयंत पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या :
हे सगळं शरद पवारांचं नाटक; ती महिला कशीही असू दे, पण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे: सोमय्या
धनंजय मुंडेंवरचं राजीनाम्याचं गंडांतर तूर्तास टळलं; राष्ट्रवादीची वेट अँड वॉच भूमिका
(Dhananjay Munde was tortured he was in trouble said Jayant Patil)