कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीसाठी गुडन्यूज, रुग्णवाढीच्या वेगात कमालीची घट
गेल्या चार दिवस धारावीत नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही 25 किंवा त्याहून कमी आढळत (Dharavi Corona Patient decreasing) आहे.
मुंबई : राज्यातील हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सुरुवातीला हॉटस्पॉट बनलेला धारावीचा रुग्णवाढीचे प्रमाण कमी झालं आहे. गेल्या पाच दिवसात धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावलेला पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काल धारावीत केवळ 10 रुग्ण आढळून आले. (Dharavi Corona Patient decreasing)
धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर धारावीत कोरोनाने हातपाय पसरायला सुरु केले. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे कोरोनाला आवरणं कठीण होईल की काय याची भीती होती. गेल्या महिन्यात धारावीत दिवसाला 80 ते 90 रुग्ण आढळले होते.
त्यामुळे धारावीत कोरोनाला आवरणं कठीण झालं होतं. अगदी दाटीवाटीचा परिसर असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणं कठीण झालं होतं. त्यानंतर पालिकेने धारावीकडे विशेष लक्ष देत अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता धारावीतील आकडे कमी झाल्याचा दावा प्रशासन करत आहे.
गेले पाच दिवस धारावीत कोरोना रुग्णाची संख्या घटलेली दिसत आहे. तसेच गेल्या चार दिवस धारावीत नवीन कोरोनाबाधित रुग्ण 25 किंवा त्याहून कमी आढळत आहे. मात्र सध्या कोरोना रुग्णवाढीचा दर घटला आहे.
धारावीतील गेल्या पाच दिवसातील रुग्णसंख्या
- 2 जून – 25
- 3 जून – 19
- 4 जून – 23
- 5 जून – 17
- 6 जून -10
सद्यस्थितीत धारावीत 1899 कोरोनाचे रुग्ण आहेत. तर 71 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या पथकांनी घरोघरी जाऊन तब्बल सात लाखांहून अधिक रहिवाशांची तपासणी केली आहे. तसेच रुग्णांसाठी पालिका आणि खासगी दवाखाने सज्ज ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन केलेले उपचार, करोनाबाधितांच्या संपर्कातील संशयितांना वेळीच विलगीकरणात ठेवण्यासाठी उचललेली पावले इत्यादी कारणांमुळे धारावीमधील करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला यश येऊ लागले (Dharavi Corona Patient decreasing) आहे.
जळगावच्या रुग्णालयातून 82 वर्षाची कोरोनाबाधित महिला बेपत्ता, आजींचा शोध सुरुhttps://t.co/frZ6akm1JT
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 7, 2020
संबंधित बातम्या :
मुंबईकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात घट
97 वर्षाच्या आजीची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी, केवळ सात दिवसात डिस्चार्ज