जब तक तोडेंगे नही, तब तक छोडेंगे नही, धारावी सातव्यांदा शून्यावर, महापालिकेने करुन दाखवलं!

Dharavi : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील (Dharavi Corona) रुग्णसंख्या पुन्हा एकदा शून्यावर आली आहे. दुसऱ्या लाटेत (corona second wave) पहिल्यांदा तर आतापर्यंत सातवेळा धारावीची रुग्णसंख्या शून्यावर आली आहे.

जब तक तोडेंगे नही, तब तक छोडेंगे नही, धारावी सातव्यांदा शून्यावर, महापालिकेने करुन दाखवलं!
corona
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 5:29 PM

मुंबई : जब तक तोडेंगे नही, तब तक छोडेंगे नही, हा मांझी या हिंदी सिनेमातील डायलॉग मुंबई महापालिकेने खरा करुन दाखवल्याचं चित्र आहे. कारण आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील (Dharavi Corona) रुग्णसंख्या पुन्हा एकदा शून्यावर आली आहे. दुसऱ्या लाटेत (corona second wave) पहिल्यांदा तर आतापर्यंत सातवेळा धारावीची रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. मुंबई महापालिका (BMC) आणि धारावीकरांनी हे करुन दाखवलं आहे. (Dharavi World biggest slum from Mumbai reports zero Covid-19 positive cases seventh time)

एकाच दिवसात एकही रुग्ण न सापडण्याची घटना सर्वात आधी गेल्यावर्षी म्हणजे 25 डिसेंबरला घडली. 25 डिसेंबर 2020 रोजी धारावीत पहिल्यांदा शून्य रुग्ण आढळले होते. त्यानंतर पुन्हा ठराविक दिवसांनी रुग्णवाढ, कमी-जास्त होत होती. पण गेल्या दोन वर्षात तब्बल 7 वेळा धारावीत एकही रुग्ण आढळला नाही.

धारावी कधी कधी शून्यावर? 

  • 25 डिसेंबर 2020
  • 22 जानेवारी 2021
  • 26 जानेवारी 2021
  • 27 जानेवारी 2021
  • 31 जानेवारी 2021
  • 2 फेब्रुवारी 2021
  • 14 जून 2021

पालिका आणि धारावीकरांनी करुन दाखवलं : महापौर

दरम्यान, याबाबत महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “हे मुंबई महापालिकेचं यश आहे. याबद्दल धारावीकरांचं स्वागत करायला हवं आहे. 7 वेळा धारावी शून्यावर आली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केलं. त्याला लोकांनी योग्य प्रतिसाद दिला. धारावी शून्यावर आली तरी पुढे नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. धारावीकर आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी करुन दाखवलं आहे”

कोरोनाची दुसरी लाट

गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत करोनाने शिरकाव केला. त्यानंतर धारावी करोनाचा हॉटस्पोट ठरला होता. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बीएमसीने धारावी पॅटर्न राबवला आणि पालिकेच्या या पॅटर्नमुळे धारावीतील रुग्णसंख्या अटोक्यात आली. मात्र, कोरोनाच्या दुसरी लाट गेल्या वर्षी पेक्षाही जास्त भयानक ठरली. मात्र दुसऱ्या लाटेत धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला नाही.

संबंधित बातम्या 

Maharashtra 5 level Unlock: अनलॉकच्या 5 लेव्हलमध्ये तुमच्या जिल्हा आणि महानगरपालिकेची स्थिती काय? रेड झोनमध्ये कोणते जिल्हे?

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.