रेल्वे अपघातातील वैद्यकीय मदतीला ब्रेक, विरार-डहाणू प्रायव्हेट रूग्णालयांशी केलेला करार संपला

पश्चिम रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार लोकल प्रवासात जखमींना सरकारी खर्चात तातडीचे उपचार मिळावे म्हणून सरकारी रूग्णालय नाही तेथे खाजगी रूग्णालयांशी करार केला होता, तो संपला आहे.

रेल्वे अपघातातील वैद्यकीय मदतीला ब्रेक, विरार-डहाणू प्रायव्हेट रूग्णालयांशी केलेला करार संपला
Western-RailwayImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 1:27 PM

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर विरार ते डहाणू दरम्यान लोकल अपघातातील जखमींवर वेळेत उपचार करण्यासाठी खाजगी रूग्णालयांशी केलेला करार संपुष्ठात आल्याचे धक्कादायक बाब उघड झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरटीआय कार्यकर्ते समीर झव्हेरी यांना माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती कळविली आहे. त्यामुळे विरार – डहाणू दरम्यान प्रवास करताना प्रवाशांना अत्यंत सावधानतेने प्रवास करावा लागणार आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून लक्ष घालण्याची विनंती आरटीआय कार्यकर्ते झव्हेरी यांनी केली आहे.

उपनगरीय लोकलच्या प्रवासात वर्षाला दोन ते अडीच हजार प्रवाशांच्या अपघाती मृत्यू होत असतो. साधारण इतकेच प्रवासी दरवर्षी जखमी होत असतात. यातील सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना होत असतात. पूर्वी दररोज सरासरी दहा प्रवाशांचा लोकल प्रवासात बळी जात होता. आता ही संख्या रेल्वेने उचललेल्या पावलांमुळे कमी झाली आहे. अशा अपघातात बळी जाणाऱ्या तातडीची मदत मिळावी यासाठी आपात्कालिन वैद्यकीय कक्षासोबतच स्थानिक रुग्णालयांसी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर करार करण्यात आले होते. त्यातील विरार ते डहाणू सेक्शनमधील स्थानिक खाजगी रूग्णालयांशी केलेला करार संपला असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते समीर झव्हेरी यांना माहितीच्या अधिकारात मिळाली आहे.

 माहितीच्या अधिकारात उघड 

रेल्वे स्थानकाच्या पाच किलोमीटर अंतरावर जर सरकारी रूग्णालय उपलब्ध नसेल तर जखमींवर उपचार करताना पैशांअभावी हेळसांड होऊ नये म्हणून खाजगी रूग्णालयाबरोबर करार करण्यात आला होता. त्यामुळे या उपचाराचा खर्च रेल्वे प्रशासन भरणार होते. परंतू, 9 फेब्रुवारी 2023 मध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनच्या अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ.सोनाली घुमरे यांनी झव्हेरी यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तरात सध्या विरार – डहाणू दरम्यान खाजगी रूग्णालयांशी सध्या अशा कोणताही करार अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले आहे.

रेल्वेमंत्र्यांना साकडे

रेल्वे बोर्डाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार साल 2012 मध्ये पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते विरार दरम्यान जखमी प्रवाशांवर रेल्वेच्या खर्चाने वेळेत उपचार मिळावेत यासाठी खाजगी रूग्णालयाशी करार केला होता. साल 2014 मध्ये उपनगरीय सेक्सन विरारच्या पुढे डहाणू पर्यंत विस्ताराल्याने तेथील स्थानिक खाजगी रूग्णालयांशी हा करार वाढविण्यात आला होता. सध्या विरार ते डहाणू दरम्यानाच्या जखमी प्रवाशांना रेल्वेच्या खर्चाने उपचार मिळण्यात त्यामुळे अडचण येत असल्याचे आरटीआय कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी सांगत रेल्वेमंत्र्यांनी साकडे घातले आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.