Dipali Sayyad : देहूत फडणवीसांनी प्रोटोकॉल तोडल्याचा दिपाली सय्यदांचा आरोप, तर चंद्रकांतदादा, फडणवीस म्हणतात पुरे झालं आता…
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावरूनच भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. तसेच पंतप्रधान कार्यलयाला भाषणाची परवानगी मागूनही त्यांनी ती नाकारली असा आरोपही केला होता. आज दिपाली सय्यद यांनीही यावरूनच ट्विट केलंय.
मुंबई : दोन दिवसांपूर्वीच मोदींची (PM Modi) देहू दौरा (Dehu) पार पडलाय. मात्र या दौऱ्यावेळी तापलेलं राजकारण अजूनही निवलं नाही. कारण अजित पवारांना (Ajit Pawar) भाषणाची संधी न मिळाल्याने एकापाठोपाठ एक राष्ट्र्रवादीचे नेते भाजपविरोधात आक्रमक झाले. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीकाही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून झाली. तर याच मुद्यावरून आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनीही भाजपवर आणि फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. तसेच फडणवीसांची चौकसी व्हावी अशी थेट मागणीच करून टाकलीय. तर त्याला फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावरूनच भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. तसेच पंतप्रधान कार्यलयाला भाषणाची परवानगी मागूनही त्यांनी ती नाकारली असा आरोपही केला होता. आज दिपाली सय्यद यांनीही यावरूनच ट्विट केलंय.
फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
दिपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देवेंद्रजींनी थेट देशाच्या पंतप्रधानांचे प्रोटोकॅाल तोडले. स्थानिक आमदार,खासदार,नगराध्यक्षांचे पासेस गायब केले.उपमुख्यमंत्र्यांचे नाव भाषणाच्या यादीतुन काढले.पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठ आणि स्वागताला उभे केले. खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे. देवेंद्र फडणवीसांची चौकशी व्हायालाच हवी.” असे ट्विट त्यांच्याकडून करण्यात आलंय. त्यालाच आता भाजप नेत्यांनी उत्तर दिलंय.
दिपाली सय्यद यांचं ट्विट
देवेंद्रजींनी थेट देशाच्या पंतप्रधानांचे प्रोटोकॅाल तोडले. स्थानिक आमदार,खासदार,नगराध्यक्षांचे पासेस गायब केले.उपमुख्यमंत्र्यांचे नाव भाषणाच्या यादीतुन काढले.पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठ आणि स्वागताला उभे केले. खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे. देवेंद्र फडणवीसांची चौकशी व्हायालाच हवी.
— Deepali Sayed (@deepalisayed) June 16, 2022
फडणवीसांचेही जोरदार प्रत्युत्तर
याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, अजित दादा आणि पंतप्रधान हे मन मोकळ्यापणे बोलले आहेत. काही लोकांना ते बघवत नाही, मला तर असं वाटते हे आजित दादांविरोधातचं षडयंत्र आहे, अशा शब्दात फडणवीसांनी पलटवार केलाय.
चंद्रकांत पाटलांचाही पलटवार
देहूमधील कार्यक्रमावेळी मीसुद्धा मंचावर होतो. मा. पंतप्रधान मोदीजींनी स्वतःही अजितदादांना भाषण करायला सांगितलं होतं. पण त्यांनी नम्रपणे भाषण करणार नसल्याचं मोदीजींना सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला वगैरे राजकारण आता पुरे झालं, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनीही पलटवार केलाय.
चंद्रकांत पाटलांचं ट्विट
देहूमधील कार्यक्रमावेळी मीसुद्धा मंचावर होतो. मा. पंतप्रधान मोदीजींनी स्वतःही अजितदादांना भाषण करायला सांगितलं होतं. पण त्यांनी नम्रपणे भाषण करणार नसल्याचं मोदीजींना सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला वगैरे राजकारण आता पुरे झालं. pic.twitter.com/hje5BgfeXa
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 16, 2022